१७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील निंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद उपक्रम उत्साहात पार पडला. रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्ट व वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहित्यिक तथा ग्रामीण कवी गोरक्षनाथ कृष्णाजी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

१७८ विद्यार्थ्यांना मोफत शालेय वाटप

रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिकच्या अध्यक्षा मंगलताई सिसोदिया, अर्चनाताई हिरे,सी.ए. वर्धमान सुराणा, तसेच वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मिथुन राजाराम चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहित्यिक ग्रामीण कवी गोरक्षनाथ कृष्णाजी पवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभारी येथील १७८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार वह्या, पिण्याच्या पाण्याची बाटली, कंपास, खोडरबर, पेन आणि पेन्सिल यांसारख्या रोजच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या वस्तू देण्यात आल्या. हे साहित्य मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

ग्रामस्थांकडून पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निंभारी ग्रामस्थांनी सर्व मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले. शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या वतीने उपक्रमास उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन भावूक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मंगलताई सिसोदिया, अर्चनाताई हिरे, सी. ए. वर्धमान सुराणा आणि वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मिथुन राजाराम चव्हाण आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना भेटून आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान वाटले” असं मत मंगलताई सिसोदिया (अध्यक्षा, रमणलाल लालचंद सिसोदिया चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी व्यक्त केलं.

“आजपर्यंत आम्ही ९० विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. आज निंभारी गावात हा उपक्रम राबवताना आम्हाला विशेष आनंद होत आहे” असं मिथुन राजाराम चव्हाण (संस्थापक अध्यक्ष, वसंतदादा एज्युकेशन फाउंडेशन)यांनी म्हटलं आहे.

स्थानिकांचा पुढाकार आणि आभार

आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम निंभारीत आयोजित व्हावा, यासाठी कवी गोरक्षनाथ कृष्णाजी पवार यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी आपल्या विनंतीचा मान ठेवून हा उपक्रम राबवल्याबद्दल सर्व दात्यांचे व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ रंगनाथ पवार यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील उत्साह वाढेल असा विश्वास व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचा सांगता समारोप संजय विष्णुदास पवार यांनी मानलेल्या आभाराने झाला.

ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

या प्रेरणादायी कार्यक्रमास संजय पवार, संपतराव लक्ष्मण माकोणे, हरी आबा पाटील पवार, जनु काका पवार, संजय तुळशीदास पवार, बबलू पवार यांच्यासह त्यांचे सहकारी, शाळेचे शिक्षकवृंद व निंभारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या खात्यात लवकरच १,५०० चा हप्ता जमा होण्याची…

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा