सडपातळ शरीर, डोळ्यांखाली सूज; सलमान खानची अशी अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, सलमाननेच दिलं उत्तर

सलमान खान नुकताच मुंबईतील ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’कार्यालयातील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्या दरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला कारण यात सलमानचे शरीर खूप सडपातळ आणि डोळ्यांखाली सूज दिसत होती.यामुळे त्याला काही गंभीर आजार झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. चाहत्यांना त्याच्या तब्येतीची काळजी वाटू लागली होती. व्हायरल व्हिडिओमुळे सलमान खान यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता या व्हिडीओबाबत तसेच चाहत्यांना वाटणाऱ्या त्याच्या काळजीबाबत सलमान खानने स्पष्ट केलं आहे. त्याने एका मजेशीर सोशल मीडिया पोस्टद्वारे यासर्वांवर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली आहे.

सलमानची अवस्था पाहून चाहतेही काळजीत

व्हायरल व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देत भाईजानने रात्री उशिरा त्याचे नवे फोटो शेअर करत चाहत्यांना ‘तुमची तब्येत कशी आहे?’ असा प्रश्न विचारला. पोस्टवर चाहत्यांच्या भावनिक प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूडचा ‘दबंग’ स्टार सलमानचा व्हायरल व्हिडीओमधील त्याची ती अवस्था पाहून चाहतेही काळजीत पडले. या व्हिडिओमध्ये सलमानचा बदललेला लूक पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली.

सलमान खानने अचानक एवढं वजन कमी का केलं?

नेहमी फिटनेसला प्राधान्य देणारा सलमान खान इतका बारीक आणि निस्तेज दिसत असल्याने चाहत्यांना मात्र वाईट वाटलं. सलमान खानने अचानक एवढं वजन कमी का केलं की कोणत्या आजाराने झालं असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत. मात्र, या चर्चांदरम्यान सलमानने स्वतः कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान, त्याने रात्री उशिरा ही पोस्ट शेअर केली आहे.

सलमान खानने पोस्टद्वारे चाहत्यांना दिलं उत्तर 

सलमानने त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमानचे स्वत: चे फोटो वेगवेगळ्या लूकमध्या पाहायला मिळत आहेत. एक फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि डोक्यावर हॅट घातली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने एका वेगळ्या स्टाईलची हॅट घातली आहे. आणखी एका फोटोमध्ये त्याने जॅकेट घातले आहे. सलमानचे वेगवेगळ्या पोज आणि स्टाईलमधील फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण हे फोटो शेअर करताना लिहिलेले कॅप्शन सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानच्या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स

सलमानने चाहत्यांना, “तुमची तब्येत कशी आहे?” असा प्रश्न विचारला. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही कमेंट्सच्या माध्यमातून त्याच्या प्रकृतीची विचारपूस करत, “सर, तुम्ही ठीक आहात ना?” सलमान खानच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले. एका चाहत्याने, “Love you, Bhai,” अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने, “आम्ही सगळे ठीक आहोत; तुम्ही कसे आहात?” असा प्रश्न विचारत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणखी एका चाहत्याने, “जर तुम्ही ठीक असाल, तर आम्ही सगळे ठीक आहोत,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनय कौशल्यासोबतच सोशल मीडियावर स्पष्ट राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या आयटी सेल (IT Cell),…

    अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

    बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे चेक बाऊन्स प्रकरण अद्याप सुटलेले नाही.या प्रकरणामुळे राजपालच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या…

    Leave a Reply

    You Missed

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव