आलिशान केबिन,टच-फ्री टॉयलेट अन्…‘फाईव्ह स्टार हॉटेल’ वंदेभारत स्लिपर ट्रेन पाहिली का? डोळ्यांवर विश्वास नाही बसणार ,video viral

भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण भारतीय रेल्वेमध्ये एकामागून एक नवीन आयाम जोडले जात आहेत. भारताच्या प्रसिद्ध वंदे भारत ट्रेनने लोकांच्या प्रवासाची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे.आता देशभरात १०० हून अधिक वंदेभारत एक्सप्रेस धावत आहेत. या वंदेभारत भारत सेमी हायस्पीड ट्रेन असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच आता वेगवान प्रवासाची अनुभूती मिळत आहे. मात्र आता यामध्ये आता अजून एका वंदेभारतची एन्ट्री होणार आहे. लांबच्या आणि रात्रीच्या प्रवासासाठी वंदेभारत स्लिपर ट्रेनचे आगमन झाले आहे.

फाईव्ह स्टार हॉटेलसारखी वंदेभारत

वंदेभारत स्लिपर ट्रेन ही अत्यंत आरामदायी आणि खास रात्रीचा प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या आत तुम्ही आरामात झोपून प्रवास करु शकता. देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन हावडा ते कामाख्या (गुवाहाटी) या मार्गावर धावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जानेवारी २०२६ रोजी या पहिल्या वंदेभारत स्लिपर ट्रेनचे उद्घाटन केले असून, हा मार्ग पश्चिम बंगाल आणि आसामला जोडतो.आता दुसरी वंदेभारत स्लिपर ट्रेन पुणे ते बंगळुरु मार्गावर धावणार असून १२ तासात पुणे ते बंगळुरु अंतर कापता येणार आहे. या वंदेभारत स्लिपर ट्रेनचा एक व्हिडीओ परदेशी तरुणीने व्हायरल केला आहे.ही वंदेभारत चक्क ‘फाईव्ह स्टार हॉटेल’ सारखी भासते.

View this post on Instagram

A post shared by The TridEnt (@thetrid.ent)

आतून कशी आहे ट्रेन?

या तरुणीने व्हिडीओमध्ये ट्रेनच्या आलिशान आतील भागाचे वर्णन केलं आहे. केबिन दाखवल्या आहेत, प्रभावी प्रकाशयोजना आणि स्लीपर बर्थवर प्रकाश टाकला आहे. या ट्रेनचे अत्याधुनिक इंटेरिअर, आरामदायी बर्थ, प्रायव्हसी स्मार्ट डोअर लॉक, टच फ्री सेंसर असणारे स्वच्छ बायो व्हॅक्युम टॉयलेट आणि प्रत्येक सीटजवळ एअर वेंट तसेच रिडींग लाईट्सची स्तुती केली आहे.या तरुणीने या ट्रेनची तुलना थेट ‘फाईव्ह स्टार हॉटेल’ सोबत केली आहे.

या वंदे भारतचे आणखी वैशिष्ट्य काय आहे?

वंदे भारत ट्रेनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा आवाज विमानापेक्षा १०० पट कमी आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांना एकदा या ट्रेनचा अनुभव घेतल्यावर पुन्हा प्रवास करण्याची इच्छा होते. वंदे भारत ट्रेन लोकोमोटिव्हशिवाय, ‘डिस्ट्रिब्युटेड ट्रॅक्शन पॉवर टेक्नॉलॉजी’ नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून चालते. तिच्या डब्यांमध्ये प्रवाशांसाठी ऑन-बोर्ड वायफाय, जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, सीसीटीव्ही, सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे, फिरणाऱ्या खुर्च्या आणि बायो-व्हॅक्यूम शौचालये यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. तिचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर आहे. एकंदरीत ही नवी वंदे भारत प्रवाशांच्या प्रवासाची उत्सुकता नक्कीच वाढवणारी असणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच