महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज; या ५ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

राज्यात सध्या ऊन-पावसाचा लपंडाव सुरू असून काही भागात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. मात्र, याच दरम्यान हवामान विभागाने एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आज, सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने सतर्कतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईसह इतर जिह्यात कसं राहणार आहे पावसाची परिस्थिती जाणून घेऊयात.

मुंबई आणि नाशिकमधील हवामानाची स्थिती

मुंबईमध्ये सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६ रोजी मुंबईत अंशतः ढगाळ हवामान असून, दिवसा तापमान २६°C च्या आसपास राहील, मात्र जाणवणारे तापमान ३०°C पर्यंत पोहोचू शकते. दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता असून, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग वाढून पावसाची शक्यता आहे.

तर नाशिकमध्येही मुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६ रोजी नाशिकमध्ये दिवसभर हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या दिवशी कमाल तापमान २६°C पर्यंत पोहोचेल, तर किमान तापमान २२°C राहण्याची अपेक्षा आहे. दुपारच्या सुमारास, विशेषतः १२ वाजता ते ३ वाजेपर्यंत, पावसाची शक्यता सर्वाधिक म्हणजे ९०% ते ८५% पर्यंत राहील.

‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

जळगाव, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात श्रावणसरी कोसळतील.विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
जळगाव, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालन, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात श्रावणसरी कोसळतील.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालाच लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किमीमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. अशामध्ये हे क्षेत्र आज अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पावसावर होताना पाहायला मिळत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच