SIR अर्जांचा काळाबाजार? चक्क झेरॉक्स दुकानात भाजप कार्यकर्त्याकडे ५०० ते १००० SIRचे ओरिजनल फॉर्म मिळाल्याचा दावा; निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स दुकानात भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे मोठ्या प्रमाणात ओरिजनल SIR फॉर्म आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना खरोखरच सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला काळिमा फासणारी आहे . भाजप कार्यकर्त्याकडे जवळपास ५०० ते १००० ओरिजनल फॉर्म आढळून आल्याचं म्हटलं जात आहे.

SIR चे अर्ज खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात आढळल्याने खळबळ 

मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी म्हणजे एसआयआर प्रक्रिया सुरू असतानाच गुरूवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील एसआयआर अर्ज खारघरमधील एका झेरॉक्स दुकानात आढळल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. हे अर्ज खासगी व्यक्तींकडे कसे पोहोचले, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. समाजमाध्यमांवर याबाबत एक ध्वनीचित्रफीती पोस्ट करत त्याद्वारे या घटनेबाबत आता प्रश्न विचारण्यात आले आहेत.

अर्ज १७ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आले होते

परंतू, हे अर्ज १७ ऑगस्ट रोजी अपलोड करण्यात आले असून, बीएलओंनी ते झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात ठेवले होते का, याची चौकशी करून खुलासा घेतला जाईल, असे पनवेलचे प्रांताधिकारी पवन चांडक यांनी स्पष्ट केले.

SIR मोहिमेच्या पारदर्शकतेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह

मात्र या प्रकारानंतर खारघरमध्ये SIR मोहिमेच्या पारदर्शकतेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या हाती SIR मोहिमेचे फॉर्म असल्याचं नागरिकांनीच रंगेहात पकडल्याचा दावा करणाऱ्या या व्हिडीओमुळे आता निवडणूक आयोगाची कथित पारदर्शक SIR मोहीम नेमकी कोणाच्या हातात चालतेय, असा सवाल जनतेतून तसेच विरोधी पक्षाकडून उपस्थित करण्यात येत आहे.

आमदार रोहित पवार यांनी देखील दिली प्रतिक्रिया

तसेच या कथित प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. SIR मोहीम फसवी आणि नावापुरतीच राबवली जातेय का? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार उपस्थित केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, लोकशाही प्रक्रिया व नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीने सर्वांनी जागरूक राहणं किती गरजेचं आहे हे या प्रकारावरून नक्कीच लक्षात येतं असंही ते म्हणाले.

निवडणूक आयोग आणि भाजप असा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता 

दरम्यान खारघरमधील या घटनेमुळे आता SIR मोहीम विरुद्ध निवडणूक आयोग आणि भाजप असा नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. तसेच सदर सर्व फॉर्म घेऊन संबंधित व्यक्ती व नागरिक खारघर पोलीस स्टेशन येथे उपस्थिती लावण्यास सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाची सत्यता व संपूर्ण माहिती पोलीस तपासातून समोर येईलच.

या कथित प्रकाराची निवडणूक आयोग दखल घेणार का?

पण आता खारघरमधील या कथित प्रकाराची निवडणूक आयोग दखल घेणार का? यातील सत्य बाजू काय हे जनतेसमोर आणलं जाणार का? तसेच या प्रकारात जर तथ्य आढळलं तर भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का? आणि SIR मोहिमेतील फॉर्म राजकीय कार्यकर्त्यांच्या हातात कसे पोहोचले, याचा खुलासा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच