मढमध्ये पथदिव्यांच्या अभावामुळे भीषण दुर्घटना; म्हशीच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, जबाबदार कोण?

मढ परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मढ रिट्रीट हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाचा भीषण अपघात झाला. हा अपघात रस्त्यावर अचानक आलेल्या म्हशीला धडकून झाला आहे . अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पण दुर्दैवाने उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या मृत तरूणाचं नाव प्रणिकेत प्रवीण पाटील असल्याची माहिती समोर आली आहे.  घटना घडताच वॉर्ड क्रमांक ४९ चे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी पोलिसांना तातडीने माहिती देऊन मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पण, तरीही या अपघाताने प्रशासकीय अनास्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हा केवळ एक अपघात आहे की प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम? असे अनेक सवाल आता नागरिक विचारत आहेत.

अंधाराचे साम्राज्य आणि वारंवार होणारे दुर्लक्ष

मढ रिट्रीटसमोरील मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावर प्रचंड अंधार असतो, ज्यामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने किंवा जनावरे स्पष्ट दिसणे कठीण होते. विशेष म्हणजे, या समस्येबाबत ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’ने यापूर्वीही अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु, पालिका आणि संबंधित प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. रस्त्यावर पुरेसा प्रकाश असता, तर कदाचित त्या तरुणाला समोर आलेली म्हैस वेळेत दिसली असती आणि त्याचा जीव वाचू शकला असता.

अपुरी आरोग्य व्यवस्था अन् उपचारांमधील विलंब जीवघेणा

अपघातानंतरची दुसरी मोठी शोकांतिका म्हणजे मढ परिसरात अद्यापही सुसज्ज मुख्य रुग्णालयाची सोय नाही. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीच्या उपचारासाठी शहरात इतरत्र हलवावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीचे काही मिनिटे उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात, मात्र मढमध्ये स्थानिक पातळीवर तातडीने वैद्यकीय मदत न मिळाल्याने हा विलंब रुग्णाच्या जीवावर बेततो.

नागरिकांचे सवाल आणि मुख्य मागण्या

एकीकडे पथ दिवे बंद असल्याने रस्त्यांवर पसरलेला अंधार, दुसरीकडे भटक्या व मोकाट जनावरांचा वाढता वावर आणि तिसरीकडे अपुरी आरोग्य यंत्रणा, या तिहेरी समस्यांमुळे मढमधील नागरिकांचे जिणे धोक्यात आले आहे. प्रशासनाने आणखी किती बळी जाण्याची वाट पाहायची, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

या पार्श्वभूमीवर मढमधील नागरिकांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये

१) पथदिवे तातडीने सुरू करावेत : बंद असलेले सर्व पथदिवे प्राधान्याने दुरुस्त करून मुख्य रस्त्यांवर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.

२) मोकाट जनावरांचा बंदोबस्त : मुख्य रस्त्यांवर अचानक येणाऱ्या भटक्या व मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. जेणेकरून असे अपघात होणार नाहीत.

३) सुसज्ज रुग्णालयाची उभारणी : मढ परिसरासाठी तातडीने सुसज्ज रुग्णालय आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

जागृत महाराष्ट्र न्यूजने यापूर्वीही हे गंभीर प्रश्न मांडले होते. पण आज घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाला जाब विचारावासा वाटतोय की, आता तरी संबंधित अधिकारी झोपेतून जागे होऊन यावर ठोस कारवाई करणार की आणखी एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहणार?

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू