लाडकी बहिणांची चिंता वाढणार! ‘लाडकी बहीण योजने’बाबत सरकारचा मोठा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पात्र लाभार्थी महिलांसाठी सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात येत्या दोन ते तीन दिवसांत हा सन्मान निधी थेट जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून या निधी वितरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पण सोबतच अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

लाडक्या बहिणींबाबतचा हा मोठा निर्णय अनेकांना अपात्र ठरवू शकतो.

राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ च्या लाभार्थी महिलांसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. लाडक्या बहिणींबाबतचा हा मोठा निर्णय अनेकांना अपात्र ठरवू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, योजनेतील तब्बल ९१ लाख लाभार्थी महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरवल्यानंतर सरकारकडून लाभार्थींची माहिती पुन्हा तपासण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांच्या पात्रतेचीही पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी

या संदर्भात महिला आणि बाल विकास विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची कागदपत्रे, पात्रतेचे निकष आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पुन्हा तपासणी होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा किंवा सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा

दरम्यान, राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याच्या वितरणाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये हा निधी थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBT च्या माध्यमातून जमा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना ही विशेष भेट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, एकीकडे हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असताना दुसरीकडे लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार असल्याची माहिती समोर आल्याने महिलांमध्ये उत्सुकता आणि काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच