एव्हरेस्ट आणि लालजी गोढू हिंगाच्या विक्रीवर FSSAI चे तात्काळ बंदीचे आदेश; निकृष्ट दर्जा आणि चुकीचे लेबलिंग

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने म्हणजे FSSAIने एव्हरेस्ट हिंग आणि लालजी गोढू हिंगच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेच्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी एव्हरेस्ट आणि लालजी गोधू यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. उत्पादन मिसब्रँडेड म्हणजे जेव्हा एखाद्या उत्पादनाच्या लेबलवर दिलेली माहिती चुकीची, दिशाभूल करणारी असते किंवा ते FSSAI च्या निर्धारित मानकांनुसार पॅकेजिंगवर तपशील योग्यरित्या न छापणे. तसेच हे हिंग निकृष्ट दर्जाचेही आढळले म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या कंपाउंडेड हिंग आणि हिंगच्या उत्पादनांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

निकृष्ट दर्जाचे हिंग 

प्रयोगशाळेतील तपासणी, बाजारातील सर्वेक्षण आणि नियामक तपासणीत कंपाउंडेड हिंग निकृष्ट दर्जाचे आणि चुकीच्या पद्धतीने लेबल केलेले असल्याचे आढळल्याचे FSSAI ने म्हटले आहे.तसेच एफएसएसएआयने म्हटले आहे की, वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केलेल्या हिंगाच्या नमुन्यांमध्ये अल्कोहोलिक अर्काचे प्रमाण ५% पेक्षा कमी असल्याचे वारंवार आढळून आले आहे.

हिंगाच्या उप्तादनात काय आहे मोठी हिंमत 

एफएसएसएआयच्या मते, एव्हरेस्ट हिंगाचे नमुने एका सरकारी प्रयोगशाळेत तपासण्यात आले. काही नमुने चुकीच्या लेबलचे आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले. सर्वात मोठा दोष अल्कोहोलमध्ये विरघळणाऱ्या अर्कामध्ये आढळला. नियमांनुसार, मिश्रित हिंगामध्ये हे प्रमाण किमान ५ टक्के असायला हवे, परंतु एका नमुन्यात ते ० टक्के होते. पिवळ्या हिंगाच्या एका नमुन्यात ३.२९ टक्के, तर काळ्या हिंगाच्या एका नमुन्यात ४.४ टक्के प्रमाण होते, म्हणजेच हे तिन्ही नमुने ५ टक्क्यांच्या मानकापेक्षा कमी होते.

एव्हरेस्टच्या 3 इतर मसाल्यांमध्ये गडबड, बंदी नाही

FSSAI च्या तपासणीत एव्हरेस्टचे इतर तीन प्रमुख उत्पादने म्हणजे एग करी मसाला, चिकन मसाला आणि गरम मसाला देखील नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले. मात्र, या तिन्ही मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली नाही.

एफएसएसएआयने कंपनीला या प्रकरणी कृती आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. कंपनीने हे सुनिश्चित केले पाहिजे की भविष्यात केवळ स्थापित मानकांचे पालन करणारी उत्पादनेच विकली जातील. प्रतिसाद समाधानकारक नसल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास, कंपनीवर पुढील कारवाई केली जाऊ शकते. २०२४ मध्ये, एव्हरेस्टसह काही मसाल्यांच्या ब्रँडच्या उत्पादनांमध्ये एथिलीन ऑक्साईडच्या वापराबाबत हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

या 3 मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात FSSAI चा नवीन प्रस्ताव

दरम्यान या 3 मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात FSSAI चा नवीन प्रस्ताव मांडला आहे.

लाल रंगाचे षटकोनी चिन्ह: FSSAI ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्यांनी पॅक केलेल्या खाद्यपदार्थांसाठी पॅकेटच्या समोर एक नवीन ‘इशारा लेबल’ लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे चमकदार लाल रंगाचे षटकोनी चिन्ह असेल.

या वस्तूंची ओळख होईल: हे लाल चिन्ह अशा उत्पादनांची ओळख करेल ज्यात साखर, मीठ किंवा सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पाऊल: न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने FSSAI आणि सरकारला फ्रंट-ऑफ-पॅक इशारा लेबल लागू करण्यातील विलंबाबद्दल फटकारल्यानंतर काही दिवसांनी हा प्रस्ताव सादर केला आहे.

उत्पादकांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचे आवाहन

दुसरीकडे, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व्यावसायिकांना केवळ सरकारी नियमांचे पालन करण्यापुरते मर्यादित न राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी कंपन्यांना ग्राहकांप्रती अधिक जबाबदार आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच