मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम उपनगरांमध्ये पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजे SIR प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम उपनगरातील १५ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण ४५ लाख ७२ हजार ३७८ नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल १५ लाख ६८ हजार मतदारांची पडताळणी होऊ शकलेली नाही. केवळ ३० लाख ३७ हजार ५०७ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून, उर्वरित मतदार बेपत्ता, निधन झालेले किंवा स्थलांतरित झाल्यामुळे ‘अन-कलेक्टेबल’ यादीत गेले आहेत. या निष्पन्नतेमुळे तब्बल सात मतदारसंघांतील लाखो मतदार मतदारयादीतून बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्सोवात ३८.५१, वांद्रे पश्चिम ३७.९९,मतदार पडताळणीबाहेर

मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर आहेत. त्यानंतर वर्सोवा ३८.५१, वांद्रे पश्चिम ३७.९९, गोरेगाव ३६.४७, अंधेरी पश्चिम ३६.४६, दिंडोशी ३५.४७, वांद्रे पूर्व ३४.४७, कांदिवली पूर्व ३३.६९, चारकोप ३२.९१, विलेपार्ले ३१.६३, अंधेरी पूर्व ३१.३५, जोगेश्वरी पूर्व ३०.०८, मागाठाणे ३०.४७ व दहिसरमध्ये २९.३८ टक्के मतदारांचा नोंदणी प्रक्रियेदरम्यान संपर्क झाला नाही. दुसरीकडे बोरीवलीमध्ये सर्वात कमी म्हणजे २५.६२ टक्के मतदार सापडले नाहीत. त्यामुळे हे मतदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

वर्सोव्यात मताधिक्याच्या ७१ पट मतदार बाहेर

वर्सोवा मतदारसंघात एक लाख १४ हजार मतदार पडताळणीबाहेर आहेत. विजयी उमेदवाराला अवघे १,६०० मताधिक्य मिळाले होते. त्या तुलनेत पडताळणी बाहेरील मतदारांची संख्या त्यांच्या विजयाच्या मताधिक्याच्या ७१.२५ पट आहे.

जोगेश्वरी पूर्वमध्ये १,५४१ मतांच्या मताधिक्याच्या तुलनेत ९१ हजार ४३७ मतदार पडताळणीबाहेर आहेत. हे प्रमाण ५९.३६ पट आहे.
मालाड पश्चिममध्ये हे प्रमाण २२.७६ पट, दिंडोशीत १८.२४ पट, वांद्रे पूर्वमध्ये ७.६९ पट, अंधेरी पश्चिममध्ये ५.४२ पट आणि वांद्रे पश्चिममध्ये ५.५६ पट आहे. याउलट बोरीवलीत पडताळणीबाहेरील मतदारांची संख्या विजयी उमेदवाराच्या मताधिक्याच्या ०.८५ पट इतकी आहे.

तिप्पट मतदार गेले कुठे?

पश्चिम उपनगरातील १५ मतदारसंघांतील विजयी उमेदवारांच्या मताधिक्यांची एकत्रित बेरीज पाच लाख ४७ हजार ९६३ आहे.
पडताळणी न झालेल्या मतदारांची संख्या तब्बल १५ लाख ३४ हजार ८७१ आहे. म्हणजेच पडताळणीबाहेरील मतदारांची संख्या एकत्रित मताधिक्याच्या सुमारे तिप्पट असल्याचे आढळून आले आहे.

लाखभर मतदार अद्याप पडताळणीबाहेर

मालाड पश्चिमेतील १,४१,६६७, गोरेगावमधील १,२२,९६४, दिंडोशी येथील १,१२,८०८, वर्सोव्यातील १,१४,०००, वांद्रे पश्चिमेतील १,१०,७८१, चारकोपचे १,०६,९५०, अंधेरी पश्चिम येथील १,०६,१७२ मतदार पडताळणीबाहेर आहेत.

मालाड पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मतदार पडताळणीबाहेर राहिल्याचे स्पष्ट झालं आहे. तर बोरीवलीत हे प्रमाण सर्वात कमी आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच