नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाच्या महाप्रलयाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, नेपाळच्या ‘राष्ट्रीय आपत्ती धोका निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने’ (NDRRMA) पुन्हा एकदा मोठ्या महापुराचा इशारा दिला आहे. दरम्यान नेपाळमधील ५७९ आणि तिबेटमधील पाच मृतांसह प्रलयबळींची संख्या शुक्रवारी ५८४वर पोहोचली असून, १९२४ जण अद्याप बेपत्ता आहेत.

 सहा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० जण अडकले

पूर आणि चिखलाच्या समस्येमुळे रसुवा जिल्ह्यातील तब्बल सहा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक नागरिक आणि कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाचे मुख्य लक्ष अप्पर त्रिशुली, अप्पर त्रिशुली-१, रसुवा, त्रिशुली ३-ए, चिलिमे खोला आणि लांगटांग या प्रकल्पांवर केंद्रित आहे. त्रिशुली ३-ए प्रकल्पाच्या बोगद्याच्या तोंडाशी तुंबलेला प्रचंड चिखल व दगड बाजूला करण्यासाठी नेपाळ सैन्याकडून ड्रिलिंग मशिनचा वापर केला जात आहे.

लोकांचा शोध घेण्यासाठी हाय-टेक ड्रोन वापरले जात आहेत

इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहीमअत्यंत प्रतिकूल हवामान आणि उद्ध्वस्त झालेले रस्ते या आव्हानांचा सामना करत यात लष्कराचे ७,००० आणि NAPF चे ४,००० जवान तैनात करण्यात आले आहेत. हे जवान यांची संयुक्त पथके बचावकार्यात उतरले आहेत. अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी हाय-टेक ड्रोन वापरले जात आहेत. रसुवा येथील धुंचेपर्यंतचा मार्ग चारचाकी वाहनांसाठी मोकळा करण्यात आला असून पाऊस उघडताच हेलिकॉप्टर व अन्य यंत्रणांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली जात आहे.एनएपीएफचे प्रवक्ते आणि डीआयजी नेत्रबहादूर कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार,

दरम्यान, नेपाळ सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल राजाराम बसनेत यांनी सांगितले की, त्रिशुली ३-ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात जमा झालेला चिखल आणि दगड बाजूला करून मार्ग तयार करण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे.

नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बाधित जलविद्युत् प्रकल्पांचा भारताला मोठा फटका

तसेच नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे जलविद्युत् प्रकल्पांना मोठा फटका बसला आहे.यामुळे भारतालाही मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारताला वीजपुरवठा करणारा १४ मेगावॅट क्षमतेचा देवीघाट जलविद्युत् प्रकल्पही पुरामुळे प्रभावित झाला आहे. यामुळे नेपाळने भारताला होणारा वीजपुरवठा सुमारे ८०० मेगावॅटवरून निम्म्यावर म्हणजे किमान ४०० मेगावॅटपर्यंत अल्प केला आहे. नेपाळच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे देशातील सुमारे १३ जलविद्युत् प्रकल्प आणि एका सौर प्रकल्प यांची हानी झाली आहे. या पुराचा फटका जवळपास ३५९ मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना बसला असून यातील बहुतांश प्रकल्प जलविद्युत् आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    दक्षिण दिल्लीतील सत्यनिकेतन भागात मुलांचे वसतिगृह असलेली ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर १०जण गंभीर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अद्याप ३०…

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    शिक्षक दिनानिमित्त देशभरातली ८२ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवडण्यात आलं आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू