महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

Raigad:Mahad

महाड बिरवाडी प्रतिनिधी रामदास चव्हाण.

विद्या कोचिंग क्लास, सिद्धार्थ प्री स्कूल आणि सिद्धार्थ स्टेशनरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी गुजराती समाज हॉल, बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा पार पडला. ‘ज्ञानाचा मार्ग’ या विषयावर आधारित या कार्यक्रमाला १०० हून अधिक पालक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे वैद्यकीय व पॅरामेडिकल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ‘स्टार्स ऑफ व्हीसीसी’ संबोधत विद्यार्थ्यांचा सत्कार. मुंबई, पनवेल, रत्नागिरी, बेंगळुरू, नगर तसेच रशिया येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते इ १०वी, १२वी, शिष्यवृत्ती, ब्रेन डेव्हलोपमेंट स्कॉलरशिप, महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षा यामध्ये विशेष प्रविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक  विनय विनोद खैरे यांनी संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमास उपस्थित डॉ. महेश बागडे (ओम साई संस्था व साई छाया चॅरिटेबल ट्रस्ट), माजी मुख्याध्यापक अशोक जाधव,(अध्यक्ष-बौद्धजन पंचायत समिती महाड) समाजसेविका . अपर्णा येरुणकर, (माजी जिल्हा परिषद सदस्य) नवयान बौद्ध युवा संघ अध्यक्ष डॉ. राहुल निकम आणि त्यांच्या समवेत शशिकांत खैरे सर अरुण गायकवाड सर, सुबोध मोरे सर, सतीश मोरे सर, शैलेश गायकवाड सर, दिनेश भोसले सर, डॉ. शलाका बागडे मॅडम तसेच  सारिका जाधव मॅडम अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षणाचे सामाजिक परिवर्तनातील महत्त्व, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील संधी आणि करिअर उभारणीसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास यांवर सर्वांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे डॉ.  रुचिता राऊत यांनी सादर केलेले मनःशक्ती, मानसिक स्वास्थ्य आणि अंतर्ज्ञान विकासावर आधारित संवादात्मक प्रात्यक्षिक. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्साहाने भाग घेत मानसिक आरोग्याच्या गरजेची जाणीव व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि नाट्य सादरीकरणांमधून आपली कलात्मक प्रतिभा सादर केली. शिक्षक सौ. नेहा यांनी संस्थेचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक संगोपनाचे तत्त्व उपस्थितांसमोर मांडले.
या सर्व कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्यासाठी सिद्धार्थ प्री स्कूल च्या सहशिक्षिका सौ नेहा धारिया मॅडम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अपर्णा साकपाळ यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी मान्यवर, पालक आणि शिक्षकांचे आभार मानत वर्षभराच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.वार्षिक सोहळा उत्साही वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात एक विशेष मोहीम आयोजित करण्यात येत आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि सह…

मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

रविवारी २० सप्टेंबरच्या सकाळी मुंबई कोस्टल रोडवरील एका पुलावर पहाटे एक थरारक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पूलावरून भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार थेट पूलाच्या खाली कोसळल्याची घटना घडली आहे.…

Leave a Reply

You Missed

मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?