शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

in Relationship वर मोठा निर्णय : दीर्घ सहवास व अपत्य जन्माला ‘विवाहासारखे नाते’ मान्यता – मुंबई उच्च न्यायालय

   एखाद्या पुरुषासोबत दीर्घकाळ शारीरिक संबंध, वारंवार एकत्र राहणे आणि त्या संबंधातून अपत्याचा जन्म होणे, या बाबी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, 2005 अंतर्गत ‘विवाहाच्या स्वरूपातील संबंध’ मानल्या जाऊ शकतात, असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

या टिप्पणीसह न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांच्या खंडपीठाने संबंधित व्यक्तीविरोधात दाखल असलेला खटला रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

 काय होते प्रकरण?

संशयित आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित असलेली कारवाई तसेच २०२२-२३ मध्ये देण्यात आलेले पोटगीचे आदेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला त्याच्या जोडीदाराला आणि अल्पवयीन मुलीला पोटगी देण्याचे आदेश दिले होते.

पीडित तरुणीचा दावा

पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, आरोपीसोबत तिचे दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. या कालावधीत ती गरोदर राहिली होती. आरोपीच्या आग्रहामुळे तिने गर्भपात केला. त्यानंतरही दोघांमधील संबंध सुरूच राहिले.

यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. सदर मुलगी सध्या आठ महिन्यांची आहे. मात्र, २०२२ मध्ये आरोपीने दुसऱ्या महिलेशी विवाह केला, त्यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार आरोपीवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी असा दावा केला की,

“केवळ शनिवार-रविवारी एकत्र राहणे किंवा ‘वन नाईट स्टँड’ म्हणजे कौटुंबिक नाते ठरत नाही.”

हा खटला सूडबुद्धीने दाखल करण्यात आला आहे, असा दावाही त्यांनी न्यायालयासमोर केला.

 पीडितेच्या वकिलांचा प्रतिवाद

पीडितेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की,

“कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील ‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’ या व्याख्येचा विस्तार करणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा महिलांना कायदेशीर संरक्षण मिळू शकेल.”

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांनी स्पष्ट केले की,

  • स्त्री-पुरुषांनी एकत्र घालवलेला कालावधी

  • शारीरिक संबंधांचे स्वरूप

  • आणि त्या संबंधातून अपत्याचा जन्म

या बाबी ‘विवाहासारख्या नात्याचे’ प्रबळ निदर्शक आहेत.

दीर्घकाळ सहवास, लैंगिक संबंध आणि मुलाचा जन्म या गोष्टी प्रथमदर्शनी कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम 2(f) अंतर्गत ‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’ या व्याख्येत बसतात.

नंतर केलेले लग्न हे पीडित महिलेला सुरुवातीच्या टप्प्यावर संरक्षण नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या कारणांमुळे सदर खटला या टप्प्यावर रद्द करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

Related Posts

“आम्हालाही कुटुंब आहे…”! सण-उत्सव आपले, बंदोबस्त माञ पोलिसांचा; पोलिसांच्या हक्कांचा विचार कधी होणार?

निवडणुका आल्या की पोलीस हवेत… गणेशोत्सव आला की पोलीस हवेत… ईद आली की पोलीस हवेत… छठपूजा आली की पोलीस हवेत… महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी आल्या की पोलीस हवेत… प्रत्येक मिरवणुकीला, प्रत्येक उत्सवाला,…

संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

आंबेडकरी विचारांची घट्ट बांधिलकी, अन्यायाविरुद्ध सातत्याने पुकारलेला पुकारा, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठीचा अखंड लढा आणि सामाजिक, राजकीय व संघटनात्मक क्षेत्रात प्रदीर्घ काळ गाजवलेले कर्तृत्व—अशा संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे आनंद (दादा) निकाळजे…

Leave a Reply

You Missed

पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

कांदिवलीत प्रशासनाचा मोठा दणका! हायकोर्टाच्या आदेशानंतर ३५ कोटींची शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; ३९ अनधिकृत झोपड्यांवर चालला बुलडोझर

वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

वादळानं दिशा बदलली! भारतावर ‘अकवान’चे मोठे संकट; १४ राज्यांना पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; आगामी अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; आगामी अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद! ‘त्या’ एका कायदेशीर मुद्द्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा मोठा युक्तिवाद

मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर अन् संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर; पण , इमारतीमधील मशिदीचा मुद्दा चर्चेत

मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर अन् संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर; पण , इमारतीमधील  मशिदीचा मुद्दा चर्चेत

मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? FDA ची धडक कारवाई, ८५० किलो मिठाई जप्त

अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? FDA ची धडक कारवाई, ८५० किलो मिठाई जप्त