CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी आंदोलकांबाबात सुप्रीम कोर्टाकडून चांगलाच झटका मिळाला आहे.वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, दिल्लीतील जंतर-मंतर किंवा कोणत्याही राज्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस सध्या कोणतीही कारवाई करणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हा दिलासा केवळ निर्दोष विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांना मोठा झटका बसला आहे.

कोर्टाने निरपराध आणि अल्पवयीन व्यक्तींना तात्काळ सोडून देण्याचे आदेश दिले. तर ज्यांचा जुना गुन्हेगारी इतिहास आहे, त्यांच्याविरुद्धचे खटले मागे घेतले जाणार नाहीत असेही म्हटले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

आंदोलकांबाबत काय निर्णय?

मीडिया अहवालानुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून ओळखल्या गेलेल्या २८७३ आंदोलकांपैकी ९८९ जणांचा गुन्हेगारी इतिहास आढळला. या लोकांवर खून, दरोडा, लूट, लैंगिक शोषण, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे खटले दाखल आहेत. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पॅलेट गन-इलेक्ट्रिक बॅटनच्या वापराचाही उल्लेख केला. कोर्टाने म्हटले की, पोलिसांच्या दडपशाहीशी संबंधित सर्व आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.

कोर्टाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने म्हटले की, ज्या इतर राज्यांत हिंसाचार झाला, तेही आपली बाजू मांडू शकतात.

 घटनांची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हायला हवी : सुप्रीम कोर्ट

मुख्य न्यायाधीशांनी म्हटले की, लोकशाहीत अशी आंदोलने होणारच. हे विद्यार्थ्यांचे पूर्णपणे शांततापूर्ण विरोध करणारे आंदोलन होते, ज्यात काही मागण्या मांडल्या गेल्या होत्या. हे घटनात्मक चौकटीत होते. कोर्टाने म्हटले की, विरोध प्रदर्शनांदरम्यान झालेल्या घटनांची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हायला हवी. सुप्रीम कोर्टाने लाठीचार्जशी संबंधित सर्व प्रकरणे एकत्र जोडली आहेत. सर्व प्रकरणांची सुनावणी एकत्रितपणे ३ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सर्व पुरावे सुरक्षित ठेवले जावेत : सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटले की, सर्व पुरावे सुरक्षित ठेवले जावेत जेणेकरून चौकशीत त्यांचा वापर करता येईल. कोर्टाने म्हटले आहे की, पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन व्हिडिओ, बॉडी-वॉर्न कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंग्ज, वायरलेसचे रेकॉर्ड आणि पीसीआर कॉल रेकॉर्ड सुरक्षित ठेवावेत. कोर्टाने म्हटले की, आंदोलकांचा डिजिटल डेटाही सुरक्षित ठेवला जावा.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

    Leave a Reply

    You Missed

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक