कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल

कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील शाळकरी मुलींनी छत्रीला माईक बनवून पत्रकाराच्या भूमिकेत आपल्या गावातील खड्डेमय रस्त्याचा जो ग्राऊंड रिपोर्ट केला होता तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.त्यांचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच तो रस्ता दुरूस्तही करण्यात आला. शाळकरी मुलांच्या या धाडसाचे सर्वांनीच कौतुक केलं. पण आता या मुलींच्या या धाडसामुळे इतर शहरातील शाळकरी मुलांनी आपापल्या गावातील रस्त्याची समस्या समोर आणण्यास सुरुवात केली आहे तेही अगदी बिनधास्त.

कर्जतच्या या ‘सकारात्मक पॅटर्न’चा आदर्श

कर्जतच्या शाळकरी मुलींच्या त्या व्हिडीओनंतर ग्रामीण भागातील चिमुकल्यांना एक नवीन ऊर्जा दिली आहे. कर्जतच्या या ‘सकारात्मक पॅटर्न’चा आदर्श घेत आता नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाळकरी मुलेही आक्रमक पत्रकाराच्या भूमिकेत उतरली असून, त्यांनी आपल्या गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेची पोलखोल केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी आणि गोहिरेवाडी येथील शाळकरी मुलांनीही तशाच प्रकारे रस्त्यांच्या वाईट आणि दयनीय अवस्थेवर थेट ग्राऊंड रिपोर्ट करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत ही चिमुकली पाण्याच्या प्लास्टीक बॉटलचा माईक करून रिपोर्टिंग करताना दिसत आहेत.

प्लास्टीक बॉटलचा माईक करून रिपोर्टिंग

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांनी प्रशासनाच्या लापरवाह कारभाराविरुद्ध सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत हा मार्ग स्वीकारला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील पेगलवाडी व गोहिरेवाडी येथील रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, साचलेले पाणी आणि चिखलाचे साम्राज्य मुलांनी कॅमेऱ्यात कैद केलं.खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, हेच समजत नाही अशी बिकट अवस्था या विद्यार्थ्यांनी आपल्या रिपोर्टिंगमधून दाखवून दिली आहे. रोज शाळेत जाताना विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना किती त्रास सहन करावा लागतो, याची गंभीर समस्या त्यांनी मांडली आहे. हा व्हिडीओ देखील असाच व्हायरल होत आहे.

स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबाव

कोकण आणि कर्जतच्या धर्तीवर आता नाशिकच्या ग्रामीण भागातही मुले पत्रकार बनून प्रश्न विचारू लागल्याने स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या सर्जनशील आणि लक्षवेधी व्हिडीओंमुळे लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली

कर्जतमध्ये ज्याप्रमाणे प्रशासनाने काही तासांत रस्ता दुरुस्त केला, तसाच तत्परता नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दाखवावी, अशी जोरदार मागणी पेगलवाडी आणि गोहिरेवाडीतील ग्रामस्थ करत आहेत. लहान मुलांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, ही चिमुकली आता प्रशासनाला काम करण्यास भाग पाडत आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच