तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

तुकाराम मुंडेंचा धडका अजूनही सुरूच आहे! महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA ने आता थेट ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’कडे आपला मोर्चा वळवला आहे. एमसीए (MCA) च्या परिसरातील तीन प्रमुख अन्न आस्थापनांवर एफडीएने मोठी कारवाई करत त्यांचे FSSAI परवाने थेट निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे हॉटेल आणि अन्न व्यवसायातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

२० ऑगस्ट २०२६ रोजी FDA च्या पथकाने मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील ‘परमीट रूम’, ‘पॅव्हिलियन’ आणि ‘मेडिटेरियन’ या तीन अन्न आस्थापनांची अचानक पाहणी केली. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे प्रचंड उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले.

स्वच्छता यासंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी या तीनही अन्न आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्नसुरक्षा, तापमान नियंत्रण, खाद्यपदार्थांची साठवणूक आणि उपकरणांची स्वच्छता यासंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. परमीट रूमच्या तपासणीदरम्यान रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याचे आढळून आले. तसेच फरशी निसरडी आणि अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. खाद्यपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक आणि तापमान नियंत्रणाबाबतही त्रुटी आढळल्या होत्या.

पॅव्हेलियनमध्ये खाद्यपदार्थांचे योग्य विलगीकरण नाही

पॅव्हेलियन या आस्थापनातील कोल्ड स्टोरेजची तपासणी केली असता विविध खाद्यपदार्थांचे योग्य विलगीकरण करण्यात आली नसल्याचे आढळले. खाद्यपदार्थांच्या साठवणुकीत आवश्यक असलेली अन्नसुरक्षा प्रक्रिया पाळली जात नसल्याचेही FDAच्या तपासणीत समोर आले. तर मेडिटेरियनमध्ये खराब आणि अस्वच्छ भांडी आढळून आली. या उपकरणांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.

खाद्यतेलाचीही नियमित तपासणी नाही

तिन्ही आस्थापनांमध्ये खाद्यतेलाची नियमित तपासणी केली जात नसल्याचे FDAच्या निदर्शनास आले. तसेच फूड ग्रेड आणि Conformity प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याचेही आढळून आले आहे. काही ठिकाणी खराब कच्चा माल देखील आढळला असल्याचे समोर आले आहे.

फ्रोझन फूडच्या हाताळणीत त्रुटी

तपासणीदरम्यान फ्रोझन फूडचे योग्य पद्धतीने वितळवले जात नसल्याचे आढळले. खाद्यपदार्थांचे आवश्यक तापमान नियंत्रणही समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय संबंधित आस्थापनांनी FSSAI परवाना प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला नसल्याचेही समोर आले आहे,

परवाना निलंबनाची कारवाई

या सर्व त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत FDAने कारवाई केली. 21 ऑगस्ट 2026 रोजी आदेश काढून परमीट रूम आणि पॅव्हिलियनचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले. मेडिटेरियन या अन्न आस्थापनाविरोधातही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. FDA ने अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    मुंबईकरांचा अत्यंत आवडीचा आणि रस्त्यावरील गाड्यांवर सर्वाधिक विकला जाणारा ‘ट्रिपल शेजवान फ्राईड राईस’ आणि इतर चायनीज पदार्थ आता अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. मुंबईतील चायनीज फूडच्या वाढत्या लोकप्रियतेसोबतच…

    मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

    मुंबईला पाणीपुरवठा करणाच्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांमध्ये मिळून सोमवारी सकाळी ९५.५३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठा बऱ्यापैकी जमा झालेला असला तरी…

    Leave a Reply

    You Missed

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंडेंची धडक कारवाई! खराब भांडी, अस्वच्छता अन् शिळे अन्न; मुंबई क्रिकेट असोसिएशनवर FDAचा मोठा दणका

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

    मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

    मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

    नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

    नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

    अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

    अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

    समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

    समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

    जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

    जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

    माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

    माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

    छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

    छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना