आदगावात विद्यार्थी गुणगौरव सोहळा! पोलीस दलात भरती झालेल्या मानसीसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव

आदगाव कुणबीवाडी मुंबई मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील बोरिवली येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

१० वी आणि १२ वीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने विशेष पदक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या मानसी पाटीलचा विशेष गौरव

या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आदगावची लाडकी लेक कुमारी मानसी निलेश पाटील हिचा विशेष सन्मान! मानसीच्या या उत्तुंग यशाबद्दल मंडळाच्या वतीने तिला सन्मानपत्र बहाल करण्यात आले. मानसीच्या अनुपस्थितीत तिचे वडील श्री. निलेश नारायण पाटील यांनी हे सन्मानपत्र स्वीकारलं. पोलीस दलात प्रवेश मिळवून संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केलं.

मान्यवरांची उपस्थिती

हा सोहळा मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन शिंदे, सेक्रेटरी अमित साळवी, खजिनदार अविनाश दुर्गावले यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ आणि आदगाव कुणबीवाडीतील ग्रामस्थ व मुंबईकर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता झाली.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू