नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरमधील गोधनी येथील उधाननगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती झाल्याने मध्यरात्री परिसरात एकच खळबळ उडाली. गॅसचा तीव्र वास परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या 200 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

उधाननगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती 

नागपूरमधील गोधनी येथील उधाननगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती झाल्याने मध्यरात्री परिसरात एकच खळबळ उडाली. गॅसचा तीव्र वास परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जलशुद्धीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरातील वस्त्या रिकाम्या करण्यात आल्या. या घटनेत सुमारे ५६ नागरिकांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यातील आठ जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

उधाननगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे ९०० लिटर क्षमतेच्या सिलिंडरमधून ही गळती झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच्या सुमारास क्लोरीन गॅसचा वास परिसरात पसरू लागल्यानंतर नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव तसेच अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

एनडीआरएफसह अन्य आपत्कालीन पथकांनाही घटनास्थळी हजर 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफसह अन्य आपत्कालीन पथकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बचाव पथकांनी आवश्यक सुरक्षा उपाय करत गॅस गळतीच्या ठिकाणी नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू ठेवलं आहे.

नागरिकांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आलं

दरम्यान, गॅसच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. रुग्णांमध्ये वृद्ध, तरुण तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. काही नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास क्लोरीन गॅसच्या गळतीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दल आणि बचाव पथकांना यश आले. त्यानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन आणि आपत्कालीन पथकांकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. गॅसची गळती नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास सुरू आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू