मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

मुंबईला पाणीपुरवठा करणाच्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांमध्ये मिळून सोमवारी सकाळी ९५.५३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठा बऱ्यापैकी जमा झालेला असला तरी पाणी कपात कायम राहणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिलं. पाणीसाठा वाढला असला तरी पाऊस सध्या थांबलेला आहे. अद्याप पावसाचा एक महिना शिल्लक असून ३० सप्टेंबरला पाणीसाठा १०० टक्के झाल्यासच तो वर्षभर पाणी पुरणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी पाणीकपात कायम ठेवण्यावर पालिका प्रशासन ठाम आहे.

तलावांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा

अप्पर वैतरणा परिसरात सर्वाधिक 45 मिमी पाऊस झाला. मोडक सागर येथे 20 मिमी, मध्य वैतरणा 16 मिमी, तुळशी 22 मिमी, तानसा 14 मिमी, भातसा 19 मिमी आणि विहार येथे 9 मिमी पावसाची नोंद झाली. जलसाठ्याच्या स्थितीमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याला सध्या मोठा आधार मिळाला आहे.  मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. रविवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार, सातही तलावांमध्ये एकूण 13,78,143 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून, हा त्यांच्या एकूण उपयुक्त साठवण क्षमतेच्या 95.22 टक्के इतका आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयातील पाणीसाठा साडेसहा टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. सात जलाशयांपैकी मुंबईच्या हद्दीत असलेले विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव जुलैच्या पहिल्याच आठवड्यात १०० टक्के भरल्यामुळे ओसंडून वाहू लागले.

पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठ्यातील वाढ निम्म्यावरच थांबली होती

मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठ्यातील वाढ निम्म्यावरच थांबली होती. परंतु त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबई महानगर परिसरात पडलेल्या पावसामुळे ३ ऑगस्टला पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेला. त्यामुळे पाणी कपात रद्द होणार अशी आशा निर्माण झाली होती. पाणी कपात रद्द करण्याची मागणीही होऊ लागली होती. मात्र पालिका प्रशासनाने पाणीकपात कायमच ठेवली आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत तलावांमध्ये 13,85,750 दशलक्ष लिटर, म्हणजेच 95.74 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाचा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी आहे. 2024 च्या तुलनेत मात्र यंदाची स्थिती चांगली असून, त्या वर्षी याच कालावधीत 94.97 टक्के साठा उपलब्ध होता.

मात्र पालिका प्रशासनाने पाणीकपात कायमच ठेवण्याचा निर्णय घेतला

यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयातील पाणीसाठा साडेसहा टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. सात जलाशयांपैकी मुंबईच्या हद्दीत असलेले विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव जुलैच्या पहिल्याच आठवड्यात १०० टक्के भरल्यामुळे ओसंडून वाहू लागले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्यामुळे पाणी साठ्यातील वाढ निम्म्यावरच थांबली होती. परंतु त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस मुंबई महानगर परिसरात पडलेल्या पावसामुळे ३ ऑगस्टला पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेला. त्यामुळे पाणी कपात रद्द होणार अशी आशा निर्माण झाली होती. पाणी कपात रद्द करण्याची मागणीही होऊ लागली होती. मात्र पालिका प्रशासनाने पाणीकपात कायमच ठेवण्याचा निर्णय घेतला.

मुंबईच्या आसपासच्या परिसरात अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि मातीतून झिरपणारे पाणी यामुळे पाणीसाठा वाढत असून पाणीसाठा सोमवारी ९५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाणी कपात मागे घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

पाणी कपात रद्द करणे शक्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं 

धरणातील पाणीसाठ्यात एक टक्का वाढ होते, तेव्हा ते पाणी तीन दिवस पुरते. ३० सप्टेंबरपर्यंत जर धरणे १०० टक्के भरली तरच तो पाणीसाठा पुढच्या मे किंवा जूनपर्यंत किंवा पाऊस सुरू होईपर्यंत पुरतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणे १०० टक्के भरली तरी मे महिन्यात राखीव साठ्याला हात घालावा लागतो. त्यातच यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले असल्यामुळे पाण्याचा काटेकोर वापर महापालिकेला करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कपात मागे घेण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाचा अजून एक महिना शिल्लक आहे. त्यातच पावसाने पुन्हा ओढ दिल्यास पाणीसाठा कमी होऊ शकतो. त्यामुळे आताच पाणी कपात रद्द करणे शक्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू