उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

मुंबई महापालिकेतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पद रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता विशाखा राऊत कोर्टात अपील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखा राऊत या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का

नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पद रद्द करण्याचा निर्णय हा उद्धव ठाककेंना मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, या निर्णयाचा विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नाही. त्यामुळे राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. हा विषय सभागृहात मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

विशाखा राऊत यांचा शिंदे सेनेवर आरोप

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, “माझ्यावर दबाव नव्हता, त्या समितीवर दबाव होता. माझे पेपर व्यवस्थित आहेत, माझे आजोबा पालघरचे होते, म्हणून तिकडून मी सर्टिफिटेक काढले. त्यांच्यावर वेगळा दबाव होता, दबावातून हे सर्व झाले. मी 1911 आणि 1937 चा पुरावा दिला, मोडी लिपीचा पुरावा दिला. आजोबा पणजोबाचे पुरावे दिले असताना सर्टिफिटेक रद्द केले. भाजपकडून दबाव नाही, शिंदेसेनेकडून दबाव आहे. मी कायदेशीर लढाई लढणार. सदा सरवणकर एक महिना आगोदर सांगून गेले, माझी मुलगी नगरसेवक होणार म्हणून. त्यांना स्वप्न पडले होते का? शिंदे यांनी स्क्रूटीनी समितीवर दबाव टाकला तसा दबाव मुंबई महापालिका मध्ये टाकतील” असं म्हणत त्यांनी राऊत यांनी आरोप केला आहे.

बुशरा नदीम मलिक यांचेही नगरसेवक पद रद्द

याआधी राष्ट्रवादीलाही याबाबत मोठा धक्का बसला होता. मुंबई महापालिकेत प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं होतं. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी आहे. बुशरा यांचेही नगरसेवक पद जात पडताळणी समितीने रद्द केले होते. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पद रद्द झाल्याने ठाकरे गटालाही मोठा धक्का बसला आहे.

रोशन शेख यांचेही पद रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या AIMIMच्या नगरसेविका रोशन शेख यांची सदस्यता रद्द केली होती. जात पडताळणी समितीने त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. महापालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 27 एप्रिल 2026 रोजी रोशन शेख यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरवले. हे प्रमाणपत्र नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आले होते.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच