मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीच्या प्रस्तावाला MMRTA ची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर 2026 पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये होणार आहे.

किती असणार नवीन भाडेवाढीचे दर?

ऑटो रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला खरं तर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने देखील मंजुरी दिलेली आहे. त्या नवीन दरानुसार रिक्षाच्या किमान भाड्यात वाढ करण्यात आलेली आहे, अशी सध्या माहिती समोर आलेली आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये रिक्षाचे भाडं कमीत कमी पहिल्या दीड किलोमीटरसाठी 26 रुपयांवरून 27 रुपये झालं आहे, तर टॅक्सीचे भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये झाले आहे. त्याचवेळी काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ झालेली आहे. आता टॅक्सीचे भाडे हे 31 रुपयांवरुन 33 रुपये करण्यात आलेले आहे.

कोणकोणत्या परिसरात असणार ही भाडेवाड

महत्त्वाचे म्हणजे ही नवीन दरवाढ फक्त मुंबईपुरती मर्यादित राहणार नाही, तर एमएमआरमधील अनेक भागांमध्ये लागून होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार तसेच पालघर या परिसरातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांना या वाढीव दरानुसारच पैसे मोजावे लागणार आहेत.

भाडेवाड वाढण्याची कारणे काय?

रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या खर्चाचा मुद्दा हा उपस्थित केला जात होता. ज्यात इंधनाच्या किमती, वाहनांची देखभाल, दुरुस्ती तसेच विम्याचा खर्च परवाना शिवाय या संबंधित असलेले अनेक खर्च वाढल्याने ही भाडेवाढ करावी, असे चालक संघटनांने म्हणणे होतं. इंधन, वाहन देखभाल आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रवाशांची मागणी पुन्हा वाढली असली तरी चालकांच्या उत्पन्नावर वाढत्या खर्चाचा ताणही आहे.

दरम्यान परिवहन आयुक्तांनी 20 ऑगस्ट रोजी भाडेवाढीसंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. याच प्रस्तावाला एमएमआरटीएने मंजुरी दिली असून आता त्यानंतर 1 सप्टेंबर पासून नवे दर लागू करण्याचा निर्णय झालेला आहे. याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती.

 मराठी येत नसलेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस

तसेच मुंबईत मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर सुरू झालेल्या कारवाईचा आज दुसरा दिवस आहे. या मोहिमेमुळे प्रादेशिक परिवहन विभागाने नियम उल्लंघन करणाऱ्यांवर देखरेख आणि दंडात्मक कारवाई तीव्र केली जात आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाद्वारे ही तपासणी सुरु आहे. मुंबईत काल मराठी भाषेवरून 1 हजार 268 रिक्षा-टॅक्सी चालकांना परिवहन विभागाच्या नोटीस आरटीओकडून बजावण्यात आली आहे. तर मराठी शिकण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ, न शिकल्यास 3 महिन्यांसाठी बॅज निलंबित करण्यात येणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच