मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, दोन घरांवर कोसळला ढिगारा

मुंबईतील कुर्ला परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री डिमोलिशनच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. इमारत पाडण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी एक जड क्रेन अचानक उलटली. या क्रेनच्या मदतीने पोकलेन मशीन इमारतीच्या वरच्या भागात नेण्याचे काम सुरू होतं. त्याचवेळी अचानक क्रेनचा तोल गेला आणि ती जोरात जमिनीवर कोसळली. क्रेनचा काही भाग जवळील दोन घरांवर तसेच मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ८ ते १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

८ ते १० जण जखमी झाल्याची माहिती

क्रेनने जेसीबी शिफ्ट करत असताना हा परिसर रिकामा करण्यात आला होता, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतु या घटनेत ८ ते १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र सुदैवाने अद्यापतरी या दुर्घटनेत कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे.

क्रेन कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईनवर कोसळली

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या वतीने जवळच सुरू असलेल्या एका कामाच्या ठिकाणी क्रेन कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईनवर कोसळली. या रेल्वे लाईनचा वापर प्रामुख्याने मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो, त्यामुळे सामान्य लोकल किंवा प्रवासी ट्रेन सेवांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

क्रेनचा काही भाग दोन घरांवर कोसळला

कुरेशी नगर परिसरातील एका जुन्या इमारतीच्या पाडकामाचे काम सुरू होते. पोकलेन मशीन इमारतीच्या वरच्या भागात नेण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला होता. मशीन वर उचलत असताना अचानक क्रेनचा तोल बिघडला. काही क्षणांतच संपूर्ण क्रेन उलटली आणि तिचा मोठा भाग आजूबाजूच्या परिसरात कोसळला. क्रेनचा काही भाग दोन घरांवर पडल्याने घरांमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

अपघाताच्या इतर बाजूंचाही शोध घेतला जात आहे. सध्या घटनास्थळावरून ढिगारा आणि मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. तर काही जण मलब्यात अडकल्याची माहिती असून स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

अपघातात घरांसह वाहनांचेही नुकसान

या अपघातात दोन घरांचे नुकसान झाले असून परिसरातील एक कार आणि ऑटो-रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. क्रेनचा भाग मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर पडल्याने रेल्वे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळाचा परिसर सुरक्षित करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. सध्या क्रेन हटवण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. या अपघाताला पूर्णपणे एमएमआरडीए जबाबदार असल्याचंही रेल्वेने म्हटले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू