तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंलुंड आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

मुंबईकरांचा अत्यंत आवडीचा आणि रस्त्यावरील गाड्यांवर सर्वाधिक विकला जाणारा ‘ट्रिपल शेजवान फ्राईड राईस’ आणि इतर चायनीज पदार्थ आता अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. मुंबईतील चायनीज फूडच्या वाढत्या लोकप्रियतेसोबतच त्यातील अस्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेत FDA ने दोन चायनीज हॉटेलवर मोठी कारवाई केलीये. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

चायनीज पदार्थांमध्ये कृत्रिम रंग आणि मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा अजिनोमोटोचा अतिवापर

FDA ने केलेल्या तपासणीत मुलुंड येथील चायना टाउन फास्ट फूड सेंटरमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहे. चायनीज पदार्थांमध्ये कृत्रिम रंग आणि मोनोसोडियम ग्लुटामेट किंवा अजिनोमोटोचा अतिवापर होत असल्याचे तसेच वारंवार वापरलेले खराब तेल वापरले जात असल्याचे निदर्शनास आलं. एवढंच नाही तर हॉटेलमध्ये झुरळांचा मोठा प्रादुर्भाव आणि अत्यंत अस्वच्छ ठिकाणी अन्न साठवणूक केली जात होती. सांडपाण्याचा योग्य निचरा नसल्याने परिसरात शेवाळ, घाण आणि प्रचंड दुर्गंधी पसरली होती.

शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी एकच जागा आणि एकाच प्रकारची उपकरणे वापरली जात असल्याने शाकाहारी ग्राहकांचे अन्न दूषित होण्याचा मोठा धोका होता. या अत्यंत गंभीर त्रुटींमुळे FDA ने या फास्ट फूड सेन्टरची अन्न व्यवसाय नोंदणी तत्काळ निलंबित केली आहे.

माहीम येथील आऊटलेटवर कारवाई

मुलुंडप्रमाणेच माहीम येथील लेनेक्सिस फूडवर्क लिमिटेड या आस्थापनेवरही FDA ने कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीदरम्यान या ठिकाणी किचनमध्ये पुरेशी व्हेंटिलेशन व्यवस्था नसल्याचे आढळून आले. तसेच येथील एक्सहॉस्ट सिस्टीम आणि किचन हूड फिल्टर्सवर तेलाचे जाड थर साचलेले होते, ज्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले.

मुंबईतील चायनीज गाड्यावाल्यांचे धाबे दणाणले

दोन्ही आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांचे थेट उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने FDA कडून ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. या कारवाईमुळे मुंबईतील इतर चायनीज गाडे आणि हॉटेल्स चालकांचे धाबे दणाणले आहेत.

शिवाजी पार्कमधील कॅफ कॅडेलचा अन्न परवाना FDA कडून निलंबित

शिवाजी पार्कमधील कॅफ कॅडेलचा अन्न परवाना FDAकडून निलंबित करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट 2026 रोजी अन्न सुरक्षा विभागाकडून कॅफ कॅडेलची तपासणी केली असता यावेळी अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या. हात धुण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या आढळल्या. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये दूषितपणा होण्याचा धोका असल्याचे FDAच्या तपासणीत समोर आले. स्वयंपाकाची उपकरणे आणि कटलरीची योग्य स्वच्छता व निर्जंतुकीकरण होत नसल्याचे आढळले. स्वच्छतेचे वेळापत्रक आणि त्यासंबंधी आवश्यक नोंदी समाधानकारक नसल्याचे समोर आले. पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या आवश्यक नोंदीही उपलब्ध नसल्याचे आढळले. या सर्व त्रुटींमुळे कॅफ कॅडेलचा FSSAI परवाना निलंबित करण्यात आला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू