तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात धडक कारवाईचा सपाटाच लावला आहे. छोट्या हॉटेलपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत, तसेच दुकानापासून ते मंत्रालयपर्यंत तर,कोर्टापासून ते अगदी पानटपरीपर्यंत सर्वच ठिकाणी धडाधड धाडी टाकत तुकाराम मुंढेंच्या FDA ने एकही ठिकाणी सोडलं नाहीय. अशातच आता पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान FDA पथकाने अचानक धाड टाकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत FDAची धाड

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वारगेट इथे गणेश कला क्रीडा केंद्रात भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या या आयोजित भाजपच्या महत्त्वाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आज राजकीय चर्चांपेक्षा एका वेगळ्याच घटनेची सर्वाधिक चर्चा रंगली. राज्यात सध्या भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असतानाच, आज या बैठकीच्या ठिकाणी एफडीएच्या पथकाने थेट ‘सरप्राइज एन्ट्री’ मारली.

जेवणाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्याच मोठ्या बैठकीत ही घटना घडल्याने सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी येऊन अन्नाची तपासणी केली आणि तपासणीसाठी नमुने घेतले. मात्र, प्राथमिक तपासणीदरम्यान त्यांना कोणताही आक्षेपार्ह प्रकार आढळलेला नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक

दरम्यान, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. मात्र, या राजकीय बैठकीच्या ठिकाणी एफडीए पथकाने केलेली अन्नपदार्थांची तपासणी सध्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

FDAकडून तपासणी आणि परवाने रद्द करण्याची कारवाई 

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरू असून भाजपाच्या बैठकीतील या कारवाईमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्रालयातील खानावळीपासून विविध शहरांतील हॉटेल्सपर्यंत FDAकडून तपासणी आणि परवाने रद्द करण्याची कारवाई होत असताना, भाजपच्या बैठकीत झालेली FDA ची एन्ट्री ही चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य शिष्टाचारानुसार ही अन्न तपासणी करण्यात आली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.…

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघात घडला आहे.छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा…

    Leave a Reply

    You Missed

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

    पोईसर जिमखान्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; गुणवंत युवा खेळाडूंचा गौरव

    पोईसर जिमखान्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; गुणवंत युवा खेळाडूंचा गौरव

    एव्हरेस्ट आणि लालजी गोढू हिंगाच्या विक्रीवर FSSAI चे तात्काळ बंदीचे आदेश; निकृष्ट दर्जा आणि चुकीचे लेबलिंग

    एव्हरेस्ट आणि लालजी गोढू हिंगाच्या विक्रीवर FSSAI चे तात्काळ बंदीचे आदेश; निकृष्ट दर्जा आणि चुकीचे लेबलिंग

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित