कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम स्वतः न्यायालयात हजर झाले होते. मात्र, आरोपीचे वकील अ‍ॅड.राहुल कासलीवाल न्यायालयात वेळेवर उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून, आता पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

कोर्टात काय घडले?

आज दुपारी 12:30 च्या सुमारास विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम आणि अ‍ॅड. अजय मिसर न्यायालयात दाखल झाले. त्यानंतर आरोपीच्या वकिलांचा पुकारा करण्यात आला. मात्र, आरोपीचे वकील राहुल कासलीवाल न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे.

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली. उज्ज्वल निकम म्हणाले की, “भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या एसआयटी विभागाने लैंगिक अत्याचाराचे आठ वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. या आठपैकी अद्याप फक्त सहा गुन्हे सेशन कोर्टाकडे वर्ग करण्यात आले आहेत. दोन अजूनही मॅजिस्ट्रेट कोर्टात आहेत, लवकरच ते सेशन कोर्टात येतील अशी आशा आहे. सेशन कोर्टातील सहा खटल्यांपैकी एका खटल्यात मला जामीन द्यावा, कारण माझा गुन्हा हा जामीनपात्र आहे अशा प्रकारची विनंती अशोक खरातने न्यायालयाला केलेली आहे.”

अर्जाची सुनावणी न्यायालयाने 16 सप्टेंबर रोजी निश्चित

“त्यावर सरकारतर्फे आम्ही त्याला जामीन देऊ नये, अशी न्यायालयात विनंती केलेली आहे. त्याला जी कारणे आहेत, ती देखील आम्ही आमच्या खुलास्यात नमूद केलेली आहेत. अशोक खरात हा विविध पीडित स्त्रियांवर कशाप्रकारे लैंगिक अत्याचार करत होता आणि त्यांच्या मनात कशाप्रकारे भीतीचा बागलबुवा निर्माण करत होता, याबाबतचा सविस्तर पुरावा न्यायालयात आमच्या खुलास्यामार्फत दाखल करण्यात आलेला आहे. या अर्जाची सुनावणी न्यायालयाने 16 सप्टेंबर रोजी निश्चित केलेली आहे. त्यावेळी त्याच्या जामीन अर्जाच्या सुनावणीवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणार आहे, यानंतर न्यायालय यासंदर्भात निर्णय देईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अशोक खरातवर तब्बल 17 गुन्हे

दरम्यान, अशोक खरात याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून तब्बल 17 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील 12 महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे आहे. 16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच