१ सप्टेंबरपासून महागाईचा चौफेर तडाखा! होणार ‘हे’ ५ मोठे बदल, महिन्याच्या बजेटला फटका, दूध ते कार काय महागलं अन् काय स्वस्त?

१ सप्टेंबर उजाडलाय आणि या नवीन महिन्याची सुरुवात झाली असून आजपासून देशात अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे. विशेषतः मुंबईकरांवर तर महागाईचा चौफेर तडाखा बसणार असल्याचं दिसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी या ५ मोठे बदल होणार आहे ज्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे बदलणार आहे .गॅस, दूध ते थेट ऑटो-टॅक्सीच्या प्रवासापर्यंत काय-काय महाग झालंय आणि काय स्वस्त जाणून घेऊयात.

१ सप्टेंबरपासून लागू झालेले हे पाच मोठे बदल

पहिला बदल : CNG चे दर वाढल्याने ऑटोचे भाडेही वाढले

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात खिशावर अतिरिक्त भार टाकणारी ठरली आहे. एका बाजूला महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या किमतीत वाढ केली आहे, तर दुसरीकडे CNG च्या दरवाढीसोबतच टॅक्सी आणि ऑटोचे भाडेही वाढले आहे.

MGL ने CNG च्या दरात २ रुपये प्रति किलो वाढ केली आहे. या वाढीनंतर मुंबईत CNG ची किंमत आता ८८ रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, दिल्ली-NCR मध्ये गॅस पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने देखील CNG च्या दरात ३.८९ रुपये प्रति किलो वाढ केली असून, नवीन किंमत ८६.९८ रुपये प्रति किलो झाली आहे.

दुसरा बदल : PNG चे दर वाढले

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वयंपाकघराच्या बजेटवरही महागाईचा परिणाम झाला आहे. पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG च्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मुंबईत करण्यात आली असून PNG च्या दरात १ रुपया प्रति SCM वाढ झाली आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून PNG ची नवीन किंमत ५३ रुपये प्रति SCM झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंधित गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम कंपनीच्या खर्चावर झाला आहे.

LPG e-KYC ची अंतिम मुदतही संपली

दरम्यान, LPG e-KYC ची अंतिम मुदतही संपली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप आपल्या LPG कनेक्शनची e-KYC केलेली नाही, त्यांना पडताळणी पूर्ण होईपर्यंत घरगुती दराने LPG सिलिंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. यासाठीची अंतिम मुदत यापूर्वी अनेक वेळा वाढवण्यात आली होती. आधी १६ ऑगस्ट, त्यानंतर २३ ऑगस्ट आणि अखेरीस ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली होती. आता ही मुदतही संपली आहे. मात्र e-KYC न केल्यामुळे तुमचे LPG कनेक्शन तात्काळ रद्द केले जाणार नाही. मात्र तुम्हाला सिलिंडर जास्त किमतीत खरेदी करावा लागू शकतो.

तिसरा बदल : कार खरेदी महागणार

१ सप्टेंबरपासून टाटा आणि ह्युंदाईच्या कार महागणार आहेत.कंपन्यांनी याबाबत आधीच घोषणा केली होती. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडने १ सप्टेंबरपासून आपल्या सर्व व्हेरिएंटच्या कार आणि SUV च्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्याचवेळी ह्युंदाई मोटर इंडिया देखील यावर्षी आपल्या कारच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ करत आहे. त्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे.

चौथा बदल : मुंबईत दूध महागले

सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांसाठी दूधामुळे खिशाला फटका बसला आहे. मात्र ही दरवाढ पॅकेटमधील दुधाच्या किमतीत झालेली नसून तबेल्यातून थेट मिळणाऱ्या दुधाच्या दरात करण्यात आली आहे. मुंबईत या दुधाच्या किमतीत ९ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून तबेल्यातील दूध ९३ रुपयांऐवजी १०२ रुपये प्रति लिटर मिळणार आहे. दूध व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, पशुखाद्याच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ तसेच इतर खर्च वाढल्यामुळे दुधाच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे.

पाचवा बदल : परदेश प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना दिलासा

१ सप्टेंबरपासून देशात एक दिलासादायक बदलही लागू झाला आहे. हा बदल परदेशात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संबंधित आहे. अहवालांनुसार, आता भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर शिक्का घेण्याची गरज भासणार नाही.

त्याऐवजी प्रवासी आपल्या मोबाईलमधील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा त्याची प्रिंटेड कॉपी दाखवून इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. यामुळे परदेश प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू