कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून एका शाळेनं चक्क त्याला ५० रुपयांचा दंड आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरा रोड मधील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळेतील एका विद्यार्थ्याने मेथीची भाजी आणली होती. शाळा व्यवस्थापनाने डब्यात मेथी आणण्याची परवानगी नसल्याचे सांगत शाळेच्या कँटीनमधील खाद्यपदार्थ आणून दिले व बदल्यात ५० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच विद्यार्थ्याच्या डब्यातील जेवणाबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्याला कॅन्टीनमधून दुसरे खाद्यपदार्थ देण्यात आले.

विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याने शाळेने विद्यार्थ्याला दंड

भाईंदरच्या इंद्रलोक भागातील तपोवन विद्यालयात हा प्रकार घडला.विद्यार्थ्याने डब्यात मेथीची भाजी आणल्याने शाळेने विद्यार्थ्याकडून ५० रुपये शुल्क घेतल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेकडे खुलासा मागितला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता चालवत असलेल्या मीरा रोड येथील एका शाळेने पर्युषण पर्व काळात कांदा-लसूणसह बटाटे असे पदार्थ आणू नये, असे परिपत्रक या शाळेने काढले होते. त्यानंतर आता भाईंदरच्या या शाळेतील हा प्रकार समोर आला आहे.

कांदा, लसूण, बटाटे नंतर आता मेथी आणण्यास मनाई

कांदा, लसूण, बटाटे यानंतर आता शाळेने विद्यार्थ्यांना डब्यात चक्क हिरवी मेथी आणण्यास मनाई केली आहे. या प्रकारावरून आता संताप व्यक्त केला जात आहे. तर या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यावर शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काही समाजांमध्ये मेथी वर्ज्य असल्याने हा आदेश देण्यात आल्याचे समजते.

विद्यार्थ्याला शाळेतून जेवण दिले

‘डब्यात हिरवी मेथी आणण्यास परवानगी नसून, विद्यार्थ्याला शाळेतून जेवण देण्यात आले आहे,’ असा शेरा वर्गशिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या दैनंदिनीत देण्यात आला. तसेच त्याला ५० रुपये दंड आकारण्यात आला. या संदर्भात संबंधित शाळेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

शाळेला कारणे दाखवा नोटीस 

या तक्रारीनंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने भाईंदरमधील ‘तपोवन विद्यालय’ या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी जैन समाजातील असल्याचे समजते. आहाराबाबत निर्बंध घालणे हे ‘शिक्षण हक्क कायद्या’चे उल्लंघन असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मनसेचा आक्रमक पवित्रा

तक्रार दाखल करणारे मनसेचे पदाधिकारी रॉबर्ट डिसूझा यांच्या म्हणण्यानुसार, तपोवन विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी जैन समाजातील आहेत आणि प्रवेशाच्या वेळी पालकांना डब्यात मांसाहारी पदार्थ व कंदमुळे न देण्यास सांगितले जाते.याआधीही शहरातील एका शाळेने कांदा, लसूण डब्यात आणण्यास मनाई केल्याप्रकरणी मनसेने महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून संबंधित शाळेला पालिकेने नोटीस बजावत, खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतरही बंदी घालण्याचे प्रकार थांबले नसल्याचे चित्र असून आता मेथीही खाण्यास वर्ज्य करण्यास सांगण्यात आल्याने पालकांनी नाराजी नोंदवली आहे.

  • Related Posts

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कोल्हापूरच्या बहुचर्चित ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेत भारतीय जनता…

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    अखेर तब्बल ६१ तासांनंतर शेतकर्‍यांच्या एल्गार आंदोलनाला यश मिळालं असून, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ‘चक्का जाम’ आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या…

    Leave a Reply

    You Missed

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    “१२ वर्ष आम्ही सहन केलं ना…”! राज ठाकरेंची भाजपाबाबत सोशल मीडियावर ‘खरमरीत पोस्ट’

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    कारखानदार झुकले! ६१ तासांनंतर ‘चक्का जाम’ मागे; राजू शेट्टींच्या ऊस दराच्या आंदोलनाला यश, पुणे-बंगळुरू महामार्ग मोकळा

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा! खवा-मिठाई खरेदी करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    ऊस दर आंदोलन पेटलं! पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल ४५ तासांंपासून ठप्प; ऐन दिवाळीत एसटीच्य १६६ फेऱ्या रद्द तर, गोकुळ दूध पुरवठ्याला फटका

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;  पण याचा भारताला काय फायदा होणार?

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली