“सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा दावा करणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटापासून दिलासा देण्यासाठी सरकारने “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार”, “३२ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी देणार” अशा मोठ्या घोषणा केल्या होत्या माञ आता त्यातच एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

३२,००० कोटींच्या मदतीचा दावा , शेतकऱ्यांच्या हातात फक्त ९४० रु.

कागदोपत्री तब्बल ३२,००० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा आकडा दाखवला जात असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या वाट्याला सरासरी अवघे ९४० रुपये आले आहेत. या तुटपुंज्या रकमेमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडाला पाने पुसली गेल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीच्या आकडेवारीवरून समोर आलेला हा महत्त्वाचा विरोधाभास आहे. सरकारकडून हजारो कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली जात असली, तरी प्रशासकीय अटी, क्लिष्ट प्रक्रिया आणि तांत्रिक त्रुटींमुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत अत्यंत तुटपुंजी रक्कम पोहोचत असल्याचे यातून स्पष्ट होते.

प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना ठेंगा

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रचार आणि प्रसार अतिशय गाजावाजा करत करण्यात आला होता. राज्यातील सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. १.५ लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होतं.

शेतकरी पूर्णपणे भरडला गेला

मात्र, आता माहिती अधिकाराखाली समोर आलेली आकडेवारी आणि बँक खात्यांचा प्रत्यक्ष ताळेबंद पाहिला असता, ३२ हजार कोटींच्या या तथाकथित महायोजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळताना शेतकरी पूर्णपणे भरडला गेला आहे. अनेक ठिकाणी कर्जमाफीचे अर्ज मंजूर झाले, मात्र खात्यावर अवघे ५०० ते ९०० रुपयेच जमा झाल्याचं वास्तव समोर आलं आहे.

शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे का?

एकूण जाहीर निधी ३२,००० कोटी करण्यात आला होता.त्यात कर्जमाफीची कमाल मर्यादा होती १ लाख ५०,००० प्रति शेतकरी, माञ प्रत्यक्षात मिळालेला सरासरी लाभ पाहिला तर ती रक्कम केवळ ९४० रुपये. या आकडेवारीमुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. “ही कर्जमाफीचे नव्हे, शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे का?” असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहेत.

तातडीची सुधारणा करणार का?

एका बाजूला अस्मानी संकटाने पीक हातातून गेले असताना, दुसरीकडे सरकारने केलेल्या या फसवणुकीमुळे बळीराजा पुन्हा एकदा नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला आहे.९४० रुपयांच्या या मदतीमुळे ग्रामीण महाराष्ट्रात असंतोषाची मोठी लाट उसळली असून, सरकार आता यावर काय तातडीची सुधारणा करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात बिनपरवाना ‘जेल भरो’ आंदोलन केलं होतं. हे आंदोलन आता चांगलंच अडचणीत आणणारं ठरलं आहे.…

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    सरपंच निवडणुकीबाबत सध्या २ नियम बदलल्याची चर्चा सर्वञ होताना दिसत आहे. ते कोणते आणि त्यात खरंच काही तत्थ्य आहे का हे जाणून घेऊयात.पहिली चर्चा म्हणजे सरपंचांना प्रचारासाठी फक्त १ दिवस…

    Leave a Reply

    You Missed

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला