शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात बिनपरवाना ‘जेल भरो’ आंदोलन केलं होतं. हे आंदोलन आता चांगलंच अडचणीत आणणारं ठरलं आहे. कारण आता या आंदोलनाविरोधात कारवाई म्हणून मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह ५०० हून अधिक अज्ञातांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची परवानगी नाकारूनही हजारो तरुण रस्त्यावर

निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने २ ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी या आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती. इथं घोषणा दिल्यास, भाषणं केल्या, लाऊड स्पीकर्स लावल्यास ध्वनी प्रदुषण होईल, त्याचबरोबर वाहतूक कोंडी होईल अशी चिंता व्यक्त केली होती.

पोलिसांनी परवानगी नाकारून देखील अभिजीत दिपके यांनी पोलिसांचे आव्हान स्वीकारत ‘जेल भरो’ आंदोलनाची घोषणा केली. शिवाजी पार्कमध्ये परवानगी नाकारली म्हणून CJP ने पार्कच्या बाहेर हे आंदोलन सुरु केलं. २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ७ या वेळेत शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ जवळ मोठ्या संख्येने Gen-Z युवा वर्ग, नागरिक, तसेच चित्रपट क्षेत्रातील काही सेलिब्रिटी आणि सार्वजनिक व्यक्ती एकत्र आल्या होत्या. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी आणि ॲड. सिद्धी देवळेकर यांच्या तक्रारीवरून ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यात. अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास, रत्ना सिंह, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आफ्रिन नवाज आणि इतर कार्यकर्ते अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार बिनपरवाना जमाव जमवणे, लाऊडस्पीकरचा बेकायदेशीर वापर, वाहतुकीस अडथळा आणणे आणि पोलीस आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, अधिक चौकशी सुरू असल्याचे शिवाजी पार्क पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आणखी गुन्हे दाखल करा, लोकशाही वाचवण्यासाठी लढा सुरूच राहील”

गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर आपली भूमिका स्पष्ट केली. “आमच्यावर आणखी गुन्हे दाखल करा, पण लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता वाचवण्यासाठी आमचा लढा असाच सुरू राहील,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

१० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा इशारा

दरम्यान, जर मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला नाही, तर येत्या १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे राष्ट्रीय पातळीवर शांततापूर्ण आंदोलन केले जाईल, अशी घोषणाही सीजेपीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत निवडणूक आयोगाविरोधातील हे आंदोलन आणखी उग्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना आंदोलनाबाबत बरेच सल्लेही दिले. सोबतच मी इथे भाषण करायला…

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचा सल्ला राज ठाकरेंनी…

    Leave a Reply

    You Missed

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल