नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अर्दे राज्य मंत्रिमंडळ, व्हीआयपी आणि विविध आखाड्याच्या साधु-संतांची मांदियाळी होणार आहे.

सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन धार्मिक शहरांमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ भरतो. लाखो भाविक गोदावरी नदीत पवित्र स्नान करतात. नाशिकमध्ये रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर स्नान केले जाते.जगभरातून कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची अपेक्षा आहे. याच कार्यक्रमात शंखनादाच्या माध्यमातून बनवलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. यापूर्वी शुक्रवारी नाशिकमध्ये महाध्वज ग्रामपरिक्रमा काढण्यात आली. राष्ट्रपती भवनाच्या निवेदनानुसार, राष्ट्रपती या प्रसंगी कार्यक्रमाला संबोधितही करतील.

ध्वजारोहणाने महाकुंभमेळ्याच्या पर्वाचा औपचारिक प्रारंभ होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याचा मुख्यमंत्र्यांनी अगोदरच आढावा घेतला. कार्यक्रमस्थळाची सजावट, धार्मिक विधी आणि नियोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामतीर्थ येथे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वय राखून जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले. आज ठीक दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभ ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पर्वाचा औपचारिक प्रारंभ होणार आहे.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणासाठी रामकुंड, गाडगे महाराज पूल आणि कपालेश्वर मंदिर परिसरात एलईडी स्क्रीन उभारणार आहे. भाविकांना सोहळा थेट पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने १२०० हून अधिक स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. धार्मिक सोहळ्यासोबत स्थानिक रोजगारालाही चालना मिळणार आहे.

आज शैव आणि वैष्णव दोनही आखाड्यांचे प्रमुख एकत्र येणार

आज शैव आणि वैष्णव दोनही आखाड्यांचे प्रमुख एकत्र येणार , गेल्या अनेक वर्षांची दरी या निमित्ताने भरून निघणार आहे. ध्वजावरील भगवा रंग हा त्याग आणि वैराग्याचे प्रतीक आहे तर त्यावर चित्रित असलेला सिंह हा पराक्रम आणि धर्माच्या रक्षणाचे प्रतीक आहे. धर्मध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हे याचा अर्थ असा की, जोपर्यंत या सृष्टीत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत, तोपर्यंत ही धर्मपरंपरा आणि कुंभमेळ्याची संस्कृती अविरत चालू राहणार आहे. ५१ ते ५५ फूट उंच लाकडी किंवा धातूच्या दंडावर हा ध्वज उभारला जातो . प्रत्येक आखाड्याच्या ध्वजावर त्यांच्या परंपरेनुसार त्रिशूळ, चक्र, गदा किंवा डमरू यांसारखी पवित्र धार्मिक चिन्हे आहेत.

इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण

इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. रामकुंड आणि गोदाघाट परिसराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली आहे. या सर्वात मोठ्या आणि पवित्र सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. कुंभमेळ्यात ध्वजारोहण अर्थात धर्मध्वज उभारणे हा सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी होत आहे. आजपासून नाशिक आणि त्रंबकेश्वर मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.

कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक येण्याची शक्यता

२० महिने चालणाऱ्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये स्नानाचे ४४ मुहूर्त आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ५३ मुहूर्त आहेत. सरकारच्या अंदाजानुसार, नाशिकमध्ये ८-१० कोटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ४ कोटी भाविक येतील. नाशिक कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे वैष्णव आणि शैव आखाड्यांचे स्नान वेगवेगळ्या तीर्थस्थळांवर होते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे एकाच आयोजनाची दोन प्रमुख केंद्रे म्हणून पाहिले जाते.

  • Related Posts

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सामाजिक कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘शिवस्वराज्य सेवक संघ’ आणि ‘सिद्धेश कदम फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,…

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    सध्या ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे काहीसा का असेना पण दिलासा मिळाला आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली…

    Leave a Reply

    You Missed

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला