शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना नुकतंच पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समोर आली होती. शरद पवार यांना बुधवारी (4 नोव्हेबर) सकाळी पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर आपण शरद पवारांना घेऊन मुंबईला जात असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन दिली होती. माञ पुन्हा शरद पवारांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.

शरदचंद्र पवारांना डिस्चार्जनंतर पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

“बाबांच्या पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. आपली काळजी, सदिच्छा आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहोत”, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगितलं आहे. याआधी बुधवारी सकाळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पुण्याच्या रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली होती.

सुप्रिया सुळेंनी काय ट्वीट केलं?

“बाबांची प्रकृती आता खूप सुधारली आहे आणि आम्ही आता मुंबईला जाण्यासाठी निघालो आहोत. बाबांची उत्तम काळजी घेतल्याबद्दल रुबी हॉल क्लिनिकच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. तसेच, शरद पवरांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचेही मनःपूर्वक आभारी आहोत. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि सद्भावनांबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे”, असं सुप्रिया सुळे बुधवारी सकाळी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या.

शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल

शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरु केला होता. त्यांनी बारामतीपासून दुष्काळी भागाच्या पाहणीचा दौरा सुरु केला होता. ते सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये जावून दुष्काळी भागांना भेटी देणार होते. शरद पवार शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार होते. त्यांनी बारामतीत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला धाराशिवमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 4 नोव्हेंबरला सकाळी त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्च मिळाला. पण त्यानंतर काही तासांनी त्यांना मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आता समोर आली आहे. तिथे त्यांच्या काही टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

  • Related Posts

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. व्यवसायासाठी तब्बल लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वारंवार…

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची आता धोक्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मध्यावधी निवडणुका त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये…

    Leave a Reply

    You Missed

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळताच मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    रत्नागिरीत व्यवसायाच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा! निधी देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक, चौघांवर गुन्हा

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण याचा भारताला काय फायदा होणार?

    डोनाल्ड ट्रम्प यांची खूर्ची धोक्यात? निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा धक्का;  पण याचा भारताला काय फायदा होणार?

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    सर्वोच्च न्यायालयाचा दणका! मुंबई महानगरपालिका आयुक्त आयुक्त अश्विनी भिडेंना ५ लाखांचा दंड, पगार रोखण्याचेही आदेश

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    संघर्षाची वाट अखेरपर्यंत न सोडणारे पँथर आनंद (दादा) निकाळजे काळाच्या पडद्याआड; आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान योद्ध्याला श्रद्धानंजली

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर! जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय, कोर्टाच्या लढाईनंतर मैदानात मारली बाजी

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी! शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्यामुळे ऍडमिट, डॉक्टरांनी दिली माहिती

    दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

    दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा दणका! टीव्ही, फ्रीजसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मिठाई महागली

    मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने

    मुंबईत रंगली आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा! खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, स्पीड किक अन् स्पॅरिंगने जिंकली मने