सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट येत असल्याचा दावा

सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करणे ही शिक्षा मृत्युदंडापेक्षा कमी नाही, अशीमहत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं

सरकारी कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करणे किंवा काढून टाकणे ही अत्यंत कठोर शिक्षा आहे. तिचे परिणाम केवळ संबंधित कर्मचाऱ्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याच्या कुटुंबावरही होतात, असे सर्वोच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबरच्या आदेशात स्पष्ट केले. या शिक्षेमुळे कर्मचाऱ्याला सेवेशी संबंधित मिळालेले लाभ गमवावे लागू शकतात. परिणामी, त्याच्यावर आर्थिक संकट ओढवू शकते, असेही खंडपीठाने नमूद केले. अशा गंभीर परिणामांच्या प्रकरणांत उच्च न्यायालयाने मूकदर्शक राहू नये. योग्य प्रकरणांमध्ये न्यायालयाने स्वतःवर घातलेल्या मर्यादांपलीकडे जाऊन शिक्षेच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी केली पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले.

काय म्हटलं न्यायालयाने?

नोकरीवरून काढून टाकल्याने केवळ संबंधित कर्मचाऱ्याचेच नुकसान होत नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडते. त्याचे सेवा-संबंधित सर्व लाभ जप्त होतात आणि तो पूर्णपणे हतबल होतो. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय, केवळ ऐकीव गोष्टी किंवा संशयाच्या आधारे एखाद्याला दोषी ठरवून थेट बडतर्फ करणे हा न्यायाचा गळा घोटण्यासारखा प्रकार आहे.

तामिळनाडूतील पेरियार विद्यापीठाचे उपकुलसचिव आर. सरवणन यांना ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून सेवेतून काढले होते. मात्र, ठोस पुरावे नसताना त्यांना दोषी ठरवचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले.

पुराव्यांशिवाय दोषी ठरवणे गंभीर अन्याय

विद्यापीठाने आरोपांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय आयोग स्थापन केला होता. मात्र, या आयोगासमोर सरवणन यांच्याविरोधात कोणतेही दस्तऐवज किंवा ठोस पुरावे सादर करण्यात आले नव्हते. तसेच केवळ ऐकीव माहितीच्या आधारे एखाद्याला दोषी ठरवणे हा गंभीर अन्याय आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. चौकशी अहवालात पुराव्यांऐवजी अंदाज आणि तर्कांवर आधारित निष्कर्ष काढण्यात आले होते, असे न्यायालयाने म्हटले.

न्या.प्रशांत कुमार मिश्रा आणि न्या. श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय रद्द केला. उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांनी सरवणन यांना पुन्हा सेवेत घेण्याचा दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.

लाच प्रकरणात चौकशीसाठी नाही पूर्वपरवानगीची गरज

जनतेचे सेवक म्हणून शासकीय नोकरीत असलेल्यांविरुद्ध लाच मागण्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. लाच मागण्याचे कृत्य हे अधिकृत कर्तव्य बजावण्याशी संबंधित नसते. कायद्यांतर्गत केवळ अधिकृत कर्तव्ये बजावताना केलेल्या कृतींनाच संरक्षण मिळते, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.

नेमकं प्रकरण काय?

राजस्थान उच्च न्यायालयाने कॉन्स्टेबल तेजाराम यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत आरोप निश्चित करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेपास नकार दिला होता. याला संबंधित कॉन्स्टेबलने आव्हान दिले होते.

याच आधारे न्यायालयाने आपल्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशात स्पष्ट केले की, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला नोकरीवरून बडतर्फ करणे किंवा काढून टाकणे ही केवळ एक प्रशासकीय कारवाई नसून, ती त्या कर्मचाऱ्यासाठी ‘मृत्युदंडासारखीच’ अत्यंत कठोर शिक्षा आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    खांद्यावर, छातीवर जखमा अन् उजव्या हाताला बँडेज; गोळीबाराच्या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफचा Video व्हायरल, उपमुख्यमंञी एकनाथ शिंदेंही सोबत

    मुंबईतील जुहू भागात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामुळे नक्कीच सर्वांना धक्का बसला आहे. फूटबॉलची मॅच खेळून घराकडे परतत असताना त्याच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन…

    Video पाहून अंगावर काटा येईल! ट्रकने ४० ते ५० भाविकांना चिरडले; 15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी

    देवीच्या दर्शनाला जाताना भाविकांसोबत दुर्देवी घटना घडली आहे. भाविकांच्या गर्दीतच थेट ट्रक घुसल्याने अपघात घडला. या अपघातात थेट १२ ते १५ जणांना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तब्बल ४०…

    Leave a Reply

    You Missed

    सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट येत असल्याचा दावा

    सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट येत असल्याचा दावा

    ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटात परभणीचा सुपुत्र; स्वप्नील धोंडगेनं साकारली ५ गोळ्या झेलणाऱ्या वीर पोलिसाची भूमिका

    ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटात परभणीचा सुपुत्र; स्वप्नील धोंडगेनं साकारली ५ गोळ्या झेलणाऱ्या वीर पोलिसाची भूमिका

    खांद्यावर, छातीवर जखमा अन् उजव्या हाताला बँडेज; गोळीबाराच्या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफचा Video व्हायरल, उपमुख्यमंञी एकनाथ शिंदेंही सोबत

    खांद्यावर, छातीवर जखमा अन् उजव्या हाताला बँडेज; गोळीबाराच्या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफचा Video व्हायरल, उपमुख्यमंञी एकनाथ शिंदेंही सोबत

    Video पाहून अंगावर काटा येईल! ट्रकने ४० ते ५० भाविकांना चिरडले; 15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी

    Video पाहून अंगावर काटा येईल! ट्रकने ४० ते ५० भाविकांना चिरडले; 15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी

    भयानक! दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

    भयानक!  दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय