मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बेनटेड असलेल्या ‘Prahaar: The Untold Story of Ujjwal Nikam’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सध्या सर्वञ याच चिञपटाची चर्चा आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि राजकुमार रावच्या अभिनयाची प्रचंड चर्चा होताना जिलत आहे. पण या बहुचर्चित चित्रपटाबाबत आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या चित्रपटात २६/११ च्या हल्ल्यातील खऱ्याखुऱ्या हिरोची भूमिका महाराष्ट्रातील एका तरुण कलाकाराने साकारली आहे. परभणी जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले स्वप्नील धोंडगे यांनी या चित्रपटात २६/११ चे वीर पोलीस अरुण जाधव यांची भूमिका साकारली आहे.
कोण आहेत पोलीस अरुण जाधव?
२६/११ च्या त्या काळरात्री पोलीस अरुण जाधव यांनी दाखवलेले धाडस आणि संयम अंगावर काटा आणणारा होता. दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने कामा हॉस्पिटलजवळ पोलिसांची व्हॅन ताब्यात घेतली होती. याच व्हॅनमध्ये पोलिसांवरही गोळीबार करण्यात आला होता.याच व्हॅनमध्ये कॉन्स्टेबल अरुण जाधव यांनाही ५ गोळ्या लागल्या होत्या, ज्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताला ३ गोळ्या लागल्या होत्या. अतिशय बिकट परिस्थितीत, व्हॅनमध्ये मृत आणि जखमी पोलिसांच्या मृतदेहांच्या आणि रक्ताच्या थारोळ्यात अरुण जाधव यांनी मृत असल्याचं नाटक केलं आणि स्वतःचा जीव वाचवला होता. याच साहसी आणि थरारक भूमिकेत अभिनेता स्वप्नील धोंडगे पाहायला मिळणार आहे.
परभणी ते ‘सन टीव्ही’ आणि आता थेट बॉलिवूडचा प्रवास
चित्रपटात अरुण जाधवांसारख्या धाडसी योद्ध्याची भूमिका साकारणारे स्वप्नील धोंडगे हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांची ही कामगिरी परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. स्वप्नील यांनी यापूर्वी ‘सन टीव्ही’ वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेत महत्त्वाचे काम केले असून, आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता ‘प्रहार’ या चित्रपटातील या भूमिकेमुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला एक नवी आणि मोठी झेप मिळाली आहे. २६/११ च्या त्या भयानक रात्रीतून सुदैवाने जिवंत रािहलेल्या आणि दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या अरुण जाधव यांच्या त्या संघर्षाला पडद्यावर स्वप्नील धोंडगे यांनी आपल्या अभिनयातून पुन्हा जिवंत केलं आहे.








