अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने पाडून कारवाई केली आहे. कापोल सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथे असलेल्या ७,८०२ चौरस फूट क्षेत्रफळाच्या बंगल्यात सुरू असलेल्या अनधिकृत बदलांची आणि बांधकाम कामांची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

अगोदर पालिकेने यासंदर्भात अजय देवगण याला नोटीस दिली होती. मात्र, नोटीस देऊनही अजय देवगण याच्याकडून काम थांबवण्यात आले नाही. अखेर थेट कारवाईच करण्यात आली. अजय देवगण यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने ही मोठी कारवाई केली.

बीएमसीने नोटीस पाठवली होती

बीएमसीच्या म्हणण्यानुसार, आवश्यक परवानगीशिवाय सिपोरेक्स ब्लॉक्सचा वापर करून बंगल्याच्या आतील भिंती, खिडक्या आणि इतर संरचनात्मक भागांमध्ये बदल केले जात होते. या संदर्भात, बीएमसीच्या बांधकाम प्रस्ताव विभागाने मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४अ अंतर्गत १० सप्टेंबर २०२६ रोजी काम थांबवण्याची नोटीस बजावली होती. देवगण कुटुंबाने उत्तरासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता, परंतु विहित वेळ निघून गेल्यानंतरही कोणतीही कागदपत्रे किंवा उत्तर सादर केले गेले नाही आणि काम गुपचूप सुरूच राहिले. अखेरीस, बीएमसीचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परवानगीशिवाय सुरू असलेले हे बांधकाम पाडण्याची कारवाई केली.

हा संपूर्ण वाद काय आहे?

हा संपूर्ण वाद बंगल्याच्या व्यावसायिक वापरावरून सुरू झाला. १० ऑगस्ट २०२६ रोजी देवगण कुटुंबाने हा बंगला ‘फ्लोरियन ह्युरेल सलून्स प्रायव्हेट लिमिटेड’ला ५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला. हा व्यवहार १० कोटी ६१ लाख रुपयांना झाला होता, ज्याचे सुरुवातीचे मासिक भाडे १६ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. बंगल्यात एक व्यावसायिक सलून आणि स्पा सुरू करण्याची योजना होती, ज्याला कापोल सोसायटीचे रहिवासी सातत्याने विरोध करत होते. रहिवाशांचे म्हणणे होते की, निवासी भागात सलून सुरू केल्यास वाहतूक, पार्किंग आणि सुरक्षेच्या गंभीर समस्या निर्माण होतील.

सोसायटीने देवगण कुटुंबाला कायदेशीर मंजुऱ्या सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती

की, २२ जुलै २०२६ रोजी, त्यांनी वीणा वीरेंद्र देवगण आणि अजय देवगण यांना बंगला केवळ भाड्याने देण्यासाठी लीव्ह-अँड-लायसन्स, ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी दिले होते, व्यावसायिक वापरासाठी किंवा संरचनात्मक बदल करण्यासाठी नाही. सोसायटीने देवगण कुटुंबाला कायदेशीर मंजुऱ्या सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. कोणतीही वैध कागदपत्रे न आढळल्याने, सोसायटीने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम (१९६६) च्या कलम ४३ आणि ५२ ते ५४ अंतर्गत कारवाईची मागणी करत, ८ सप्टेंबर रोजी बीएमसीकडे तक्रार केली.
म्हणून अजय देवगण यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने ही मोठी कारवाई केली.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    पुण्यातील एमपीएससी (MPSC) परीक्षार्थींच्या ११ दिवसांच्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन केलं होतं.…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच