मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी अर्ज केल्यानंतर पालिकेच्या जी-उत्तर विभागाने ही मंजुरी दिली आहे. मात्र, ही परवानगी सहजासहजी मिळालेली नाही तर त्यासाठी चक्क २४ अटी घालण्यात आल्या आहेत.

नेमक्या काय अटी आहेत जाणून घेऊयात 

मैदानाचा ताबा : १९ ऑक्टोबर रोजी तयारीसाठी आणि २० ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे. २० तारखेला ला सकाळी ६ वाजता मैदान मिळेल, रात्री १२ वाजेपर्यंत रिकामे करावे लागेल.

मैदानाचे भाडे : प्रतिदिन ५०० रुपये सोबत १८% GST आणि २५० रुपये परवाना शुल्क पालिकेत आगाऊ भरावा लागणार आहेत. तर, २०,००० रुपये परतावायोग्य सुरक्षा अनामत रक्कम भरणे गरजेचं असणार आहे.

परवानगी रद्द : कोणत्याही कारणाने पालिकेने परवानगी रद्द केल्यास कोणताही दावा/भरपाई मागता येणार नाही.

हायकोर्ट आदेश : उच्च न्यायालयाच्या रिट याचिका 218/2010 आणि इतर आदेशानुसार मैदान हे सायलेन्स झोन आहे, त्याचे पालन करणे बंधनकारक.

ध्वनिप्रदूषण : रात्री १०.०० नंतर कोणत्याही प्रकारे लाऊडस्पीकर/ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे.

वाहनबंदी : शिवाजी पार्क मैदानाच्या आत कोणत्याही वाहनास प्रवेश नाही. पार्किंग करता येणार नाही.

मैदानाचे नुकसान नाही : मैदानात कोणतेही खोदकाम, खड्डा करणे, खिळे ठोकणे, नुकसान करण्यास मनाई.

स्वच्छता : कार्यक्रमानंतर कचरा, घाण, निर्माल्य स्वतः उचलून मैदान स्वच्छ करावे लागेल.कार्यक्रम संपल्यानंतर मैदान आहे त्या स्थितीत पूर्ववत करून द्यावे लागेल.

नुकसान झाल्यास कारवाई : मैदानाचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त होईल आणि पुढील वर्षी परवानगी नाकारली जाईल.

मुंबई पोलिसांची परवानगी : ठाकरे गटाला फक्त महापालिकेचीच परवानगी नाही तर मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे

बेकायदेशीर बांधकामास मनाई : कोणतेही पक्के बांधकाम, स्टेजसाठी खोदकाम करता येणार नाही.

बॅनर किंवा जाहिरात : जाहिरात किंवा बॅनर लावायचे असल्यास जाहिरात विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी.

कायदा-सुव्यवस्था : कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आयोजकाची राहील. परिस्थिती बिघडल्यास परवानगी तात्काळ रद्द.

परवानगी केवळ मैदान वापरण्यापुरतीच : ही परवानगी केवळ मैदान वापरण्यापुरती आहे, इतर कोणत्याही परवान्याचा यात समावेश नाही.

खाद्यपदार्थ किंवा स्वयंपाक करण्यास मनाई : मैदानात स्वयंपाक करणे, चूल पेटवणे, अग्नीचा वापर करण्यास मनाई.

फूटपाथ,रस्ता अडवू नये : रस्ता, फूटपाथवर अतिक्रमण करता येणार नाही, जनतेस अडथळा होता कामा नये.

विद्युत परवानगी : विद्युत जोडणीसाठी नियमानुसार परवानगी घ्यावी, सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

पावसामुळे नुकसान : नैसर्गिक कारणाने, पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यास पालिका जबाबदार नाही.

कर्मचाऱ्यांची सुरक्षा : कार्यक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, विमा आयोजकाची जबाबदारी.

शांतता राखणे : कोणतेही आक्षेपार्ह भाषण, गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी.

परवानगी हस्तांतरण नाही : ही परवानगी दुसऱ्या कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही.

अंतिम अधिकार : या सर्व अटींचा भंग झाल्यास सहाय्यक आयुक्त यांना परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार राहील.

महानगरपालिकेनं या २४ अटी ठाकरे गटाला घातल्या असून यंदाचा दसरा मेळावा ठाकरे गटासाठी नक्कीच अटी-शर्तीसोबतच आव्हानात्मक ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    पुण्यातील एमपीएससी (MPSC) परीक्षार्थींच्या ११ दिवसांच्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन केलं होतं.…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच