‘कॉकरोच जनता पार्टी’ नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री झाली आहेत. सर्वांनाच याबाबत प्रश्न पडला असेल ना की हे काय नवीन. राजकारणात ही काय नवीन एन्ट्री होत आहेत. आधी कॉकरोज आणि आता मख्खी.एवंढचं नाही तर या मख्खी जनता पार्टीच्या इंस्टाग्राम पेजला ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ३,३०,००० हून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
मख्खी जनता पार्टी देणार कॉकरोच जनता पार्टीला टक्कर
या पार्टीचा संस्थापक कोण आहे? ही पार्टी कॉकरोज जनाता पार्टीला टक्कर देणार की समर्थन असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चला याबद्दल जाणून घेऊयात. मख्खी जनात पार्टीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आर्यन नावाच्या विद्यार्थ्याचे नाव संस्थापक म्हणून समोर येत आहे. ते स्वतःचे वर्णन “तरुणांची, तरुणांकडून आणि तरुणांसाठी असलेली एक अ-राजकीय आघाडी” असं सांगण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, पक्ष एका प्रवक्त्याच्या शोधात आहे. तसंच त्यांनी असही सांगितलं आहे की मख्खी जनता पार्टी कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नाहीत. @makhijantaparty.ig या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गटाचे वर्णन तरुणांसाठी एक व्यासपीठ असे केले आहे. या गटाच्या मते, लोकशाही वाचवणे हेच या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
जून २०२१ मध्ये तयार करण्यात आली होती वेबसाईटसुद्धा
खात्याच्या माहितीनुसार, हे इंस्टाग्राम पेज जून २०२१ मध्ये तयार करण्यात आले होते आणि ‘makkhijantaparty.ig’ हे सध्याचे नाव स्वीकारण्यापूर्वी त्याचे युझरनेम आठ वेळा बदलण्यात आलं . सोशल मीडियावरील उपस्थितीव्यतिरिक्त, या संघटनेची ‘makkhijantaparty.com’ नावाची एक वेबसाइट देखील आहे, जी अर्थव्यवस्था, उद्योजकता आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विषयांवर काम करते. वेबसाइटच्या वर्णनानुसार, “जर कॉकरोच जनता पक्षाला सोबत असती तर ती नक्कीच ‘मख्खी जनता पार्टी’ असती.
View this post on Instagram
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया होत्या?
मख्खी जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटला सोशल मीडियावरही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.तसेच कॉकरोच जनता पार्टीची साथ देण्याचे सल्लेही देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने दिल्लीत लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’सारख्या निर्बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संपूर्ण यंत्रणा थांबवल्याशिवाय अधिकारी सुरक्षेच्या बाबी हाताळू शकतात, असे खंडपीठाने म्हटले. “तुम्ही सर्व काही थांबवू शकत नाही,” असेही खंडपीठाने सांगितले. “एका माशीला मारण्यासाठी हातोड्याचा वापर करण्या”विरुद्ध खंडपीठाने इशारा दिला.
हातोड्याने माशी मारता येत नाही
त्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना एमजेपीने पोस्ट केले, “जेव्हा स्वतः सरन्यायाधीश म्हणाले होते, ‘तुम्ही हातोड्याने माशी मारू शकत नाही!’ आता तर एक माशीसुद्धा म्हणेल की आम्ही कोणापेक्षा कमी नाही.”








