शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाचा निकाल सुरुच असून हा निकाल कधी लागणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याचे न्यायालयाने सूचित केलं आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील कायदेशीर लढाईतील सुनावणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

आज  १३ ऑक्टोबरला होणार सुनावणी

या प्रकरणाची पुढील सुनावणी आज म्हणजे १३ ऑक्टोबरला होणार आहे. माञ सुनावणी पूर्ण होणे म्हणजे त्याच दिवशी अंतिम निकाल लागेल असे नाही, यात आणखी काही वेळ जाऊ शकतो. एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून संघर्ष सुरू झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी संपवण्याचे न्यायालयाचे नियोजन

सर्वोच्च न्यायालयात सध्या या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तरादाखल आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी संपवण्याचे न्यायालयाचे नियोजन असल्याचं समजतं.

एसआयआरवरील सुनावणी लवकर घेण्याची विनंती

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल एसआयआरवरील सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे न्यायालयाने सूचित केलं आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील एसआयआर प्रकरणाच्या सुनावणीला वेळ देण्याचा मुद्दा पुढे येऊ शकतो.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रविवारी CJP संघटनेने शिवाजी पार्कात आंदोलन पुकारलं होतं. पोलिसांची कारवाई सुरू होताच शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे…

    मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    मालाड पश्चिम परिसरात आज १२ ऑक्टोबर रोजी दुपारी  सैफुल वैद्य वय ३५   बसच्या खाली म्हणजे मागील चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी १:३० ते २:३० च्या दरम्यान…

    Leave a Reply

    You Missed

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    मालाड पश्चिमेत बस अपघात!  तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात, आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात,  आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका” CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका”  CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘या’ मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द,नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता

    रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘या’ मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द,नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा होण्याची शक्यता

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    दिल्लीत हायअलर्ट! CJP च्या आंदोलनामुळे २५० ट्रेन्स रद्द, ४५ मेट्रो स्टेशन्ससह इंटरनेटही बंद;अभिजीत दीपके, सौरव दास दिल्ली विमानतळावर उतरताच अटकेची शक्यता

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा