ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! दिवाळीच्या आधी साखरेचे भाव १७ टक्क्यांनी वाढले, किंमत ऐकून धक्का बसेल

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचं बजेट बिघडणार आहे. कारण जिथे सणांच्या दिवशी जी मिठाई किंवा फराळ बनवला जातो त्यात वापरली जाणारी साखरेमुळे सर्वांनाच शॉक लागला आहे. साखरेचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत तेही चक्क १७ टक्क्यांनी.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं, साखरेची किंमत गगनाला

देशात साखरेचे भाव १३ ते १७ टक्क्यांनी वाढले आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दर वाढले आहेत. ऊस गाळप हंगाम उशिरा सुरू झाल्याने साखरेची कमतरता आहे. सरकारचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याने दिवाळीपूर्वी दर आणखी वाढण्याची भीती आहे.

साखरेचे भाव १३ ते १७ टक्क्यानी वाढले

लोक सणासुदीसाठी खरेदी करत आहेत. त्यात देशात पुन्हा एकदा साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या किचनचं बजेट नक्कीच बिघडणार आहे. केवळ गेल्या सहा दिवसातच देशातील प्रमुख राज्यांमध्ये साखरेचे भाव १३ ते १७ टक्क्याने वाढले आहेत. या सीजनमध्ये घरांपासून मिठाईच्या दुकानापर्यंत सर्वत्र साखरेची मोठी मागणी आहे. पण बाजारात साखरेचा पुरवठा अत्यंत कमी होत आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे साखरेचे भाव प्रचंड वाढल्याचं सांगितलं जात आहे.

साखरेचा पुरवठा अत्यंत कमी

उत्तर प्रदेशात ६ ऑक्टोबरचे एक्स मिल रेट ४,६०० रुपये प्रति क्विंटल होते, ते आता १२ ऑक्टोबर रोजी १३ टक्क्याने वाढून ५,२०० रुपयांवर गेले आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात साखरेचे भाव 17 टक्क्याने वाढले आहेत. महाराष्ट्रात साखरेचा भाव ५,१०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सणातील मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने साखरेचे भाव वाढल्याचं स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

पण अचानक बाजारात साखरेची कमतरता का?

कृषी तज्ज्ञ जी. के. सूद यांच्या मते, देशात पुरेशी साखर उपलब्ध नाहीये. दिलासा देण्यासाठी बाजारात अतिरिक्त ३ टन साखर आणण्यात आली होती. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. याशिवाय स्टॉक जमा करण्यास घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे ट्रेडला मोठा फटका बसला आहे. साधारणपणे साखर कारखाने दरवर्षी लवकर गाळप करतात. पण यावेळी गाळप हंगाम लवकर सुरू झालेला नाही. महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या मोठ्या उत्पादक राज्यांमध्ये अजून ऊसाचं पीक कापणीसाठी तयार नाहीये. त्यामुळेच साखर बाजारात येण्यास उशीर होत आहे, असं सूद यांनी सांगितलं.

दिवाळीच्या आधी साखरेचे भाव आणखी उसळण्याची सरकारला भीती

साखरेचं संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली होती. बजाारात सप्लाय वाढवण्याच्या हेतूने सरकारने 10 लाख टन कच्ची साखरेच्या ड्युटी फ्री आयातीला मंजुरी दिली होती. सोबतच डिलरांवर स्टॉक लिमिटची कठोर मर्यादा लावली होती. बल्क कंझ्युमरलाही खुल्या बाजारातून थेट साखर खरेदी करण्यावर बंदी घातली होती. तसेच साखरेची साठेबाजी करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. एवढे सर्व निर्बंध लावल्यानंतरही सरकारला कोणताही दिलासा मिळताना दिसत नाहीये. एका सरकारी अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या आधी साखरेचे भाव आणखी उसळण्याची सरकारला भीती आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मढच्या रहेजा ओशन एक्सोटिका बांधकामाला BMC कडून ‘स्टॉप वर्क नोटीस’; आमदार असलम शेख यांच्या हस्तक्षेपानंतर मोठी कारवाई!

    मढ आयलँड येथील रहेजा ओशन एक्सोटिका परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे धूळ आणि वायुप्रदूषणाची समस्या निर्माण झाल्याच्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार असलम शेख यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर बृहन्मुंबई…

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रविवारी CJP संघटनेने शिवाजी पार्कात आंदोलन पुकारलं होतं. पोलिसांची कारवाई सुरू होताच शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे…

    Leave a Reply

    You Missed

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! दिवाळीच्या आधी साखरेचे भाव १७ टक्क्यांनी वाढले, किंमत ऐकून धक्का बसेल

    ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! दिवाळीच्या आधी साखरेचे भाव १७ टक्क्यांनी वाढले, किंमत ऐकून धक्का बसेल

    मढच्या रहेजा ओशन एक्सोटिका बांधकामाला BMC कडून ‘स्टॉप वर्क नोटीस’; आमदार असलम शेख यांच्या हस्तक्षेपानंतर मोठी कारवाई!

    मढच्या रहेजा ओशन एक्सोटिका बांधकामाला BMC कडून ‘स्टॉप वर्क नोटीस’; आमदार असलम शेख यांच्या हस्तक्षेपानंतर मोठी कारवाई!

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    ठाकरे बंधूंवर गुन्हा दाखल! दादरच्या शिवाजी पार्कवरील हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई, बेकायदा जमाव जमवल्याचा ठपका

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; तर ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    मालाड पश्चिमेत बस अपघात! तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    मालाड पश्चिमेत बस अपघात!  तरुण बसच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    MPSC विद्यार्थ्यांचा मोठा विजय! MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, शिपायापासून सर्व अध्यक्षांपर्यंत चौकशी;विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बसून रोहित पवारांचा जल्लोष

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात, आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    दिल्लीनंतर आता मुंबई पेटली! शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; पोलीस थेट सेना भवनाच्या परिसरात,  आदित्य ठाकरेंचा पोलीस व्हॅनवर चढून निषेध

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका” CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले

    “आदेश देऊनही मेट्रो अन् इंटरनेट का रोखले?,लोकांच्या हालचालींवर अडथळा आणू नका”  CJP आंदोलनावरील कारवाईवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक, केंद्र सरकारला फटकारले