३०० विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू अन् ५१ जणांना आर्थिक मदत; वडाळ्यात काळसूर ग्रामसेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील काळसुरी गावाशी नाळ जोडलेल्या आणि मुंबईत स्थायिक झालेल्या ग्रामस्थांचे ‘काळसूर ग्रामसेवा मंडळ, मुंबई’ यांचे ८० वे दसरा स्नेहसंमेलन गणेशनगर, वडाळा, मुंबई येथे अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडले. मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला आहे. गावाशी असलेले भावनिक नाते, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रगती आणि ग्रामविकासाचा ध्यास या संमेलनातून अधोरेखित झाला.

ग्रामविकासाचा ध्यास या संमेलनातून प्रकर्षाने अधोरेखित 

गावाशी असलेले भावनिक नाते, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रगती आणि ग्रामविकासाचा ध्यास या संमेलनातून प्रकर्षाने अधोरेखित झाला. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष किशोर सावकार, सल्लागार विठ्ठल चाळके, रमेश नाकती, गणेश नाकती, खजिनदार किशोर नाकती आणि अंतर्गत हिशेब तपासणीस रविंद्र लखमा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान गणेश मालजी नाकती यांनी भूषविले, तर मंडळाचे सचिव सुरेश पांडुरंग घोसाळकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

शैक्षणिक उपक्रम आणि गुणगौरव सोहळा

गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी या संमेलनात विशेष विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. यादरम्यान सुमारे ३०० विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले, तर ५१ विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कासाठी आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. तसेच इयत्ता दहावी, बारावी तसेच उच्च शिक्षण घेतलेल्या पदवीधर विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशाबद्दल गौरव करण्यात आला. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

पाणीटंचाईमुक्तीसाठी ‘जलसंधारणाचा’ संकल्प

गावातील पाणीटंचाईच्या समस्येवर शाश्वत मात करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत देवकुरे येथे सलग समतल चर खोदण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यात आले आहे. आगामी एप्रिल-मे महिन्यांत गावातील पाणीस्रोतांच्या वरील बाजूस जलसंधारणाची कामे श्रमदानातून हाती घेण्याचा दृढ निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. याशिवाय ‘जमिनी वाचवा, शेतकरी राजा वाचवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून जमीन, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला.

रक्तदान शिबिर व सामाजिक बांधिलकी

मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. नवी मुंबईतील नेरूळ येथे आयोजित रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले असून, या उपक्रमातून मुंबईतील काळसूर ग्रामस्थांनी आपली सामाजिक बांधिलकी उत्तमरीत्या जोपासली आहे.

मान्यवरांचा सत्कार व दसरा मिलन

संमेलनात गावातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यासोबतच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा तसेच समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. दसऱ्याच्या पारंपरिक संस्कृतीनुसार शमीची पाने ‘सोन्याचे प्रतीक’ म्हणून एकमेकांना वाटत उपस्थितांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. या स्नेहसंमेलनामुळे मुंबईत स्थायिक झालेल्या ग्रामस्थांमधील आत्मीयता, सलोखा आणि गावाप्रती असणारे प्रेम अधिक दृढ झाले.

कार्याक्रमाच्या शेवटी सचिव सुरेश घोसाळकर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. गावाचा सर्वसमावेशक विकास, विद्यार्थ्यांची उज्ज्वल प्रगती आणि लोकसहभागातून पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या ध्येयाने पार पडलेले हे ८० वे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रॅपिडो चालक, मजूर अन् बिश्नोई गँग कनेक्शन! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे तिन्ही आरोपी नेमके कोणं? अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर

    बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत गजाआड करण्यात यश मिळालं आहे. मुंबई पोलीस आणि राजस्थानच्या कोटा शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून…

    सामान्य नागरिकांचा जीव स्वस्त झालाय! शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना टँकर घुसला कसा? मालेगावात भीषण अपघातानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप

    मालेगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. मालेगावच्या गजबजलेल्या राष्ट्रीय एकात्मता चौकात हिंदुस्थान पेट्रोलियमच्या टँकरने दुचाकीला चिरडलं! एका महिलेचा जागीच मृत्यू, तर एका चिमुकल्यासह दोघे मृत्यूशी…

    Leave a Reply

    You Missed

    जिद्द आणि कर्तृत्वाचा सलाम! कांदिवलीत ९ दृष्टिहीन महिलांना अधारिका फाउंडेशनचा ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान

    जिद्द आणि कर्तृत्वाचा सलाम! कांदिवलीत ९ दृष्टिहीन महिलांना अधारिका फाउंडेशनचा ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान

    ३०० विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू अन् ५१ जणांना आर्थिक मदत; वडाळ्यात काळसूर ग्रामसेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

    ३०० विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू अन् ५१ जणांना आर्थिक मदत; वडाळ्यात काळसूर ग्रामसेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम

    रॅपिडो चालक, मजूर अन् बिश्नोई गँग कनेक्शन! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे तिन्ही आरोपी नेमके कोणं? अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर

    रॅपिडो चालक, मजूर अन् बिश्नोई गँग कनेक्शन! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे तिन्ही आरोपी नेमके कोणं? अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर

    सामान्य नागरिकांचा जीव स्वस्त झालाय! शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना टँकर घुसला कसा? मालेगावात भीषण अपघातानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप

    सामान्य नागरिकांचा जीव स्वस्त झालाय! शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना टँकर घुसला कसा? मालेगावात भीषण अपघातानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप

    सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट येत असल्याचा दावा

    सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट येत असल्याचा दावा

    ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटात परभणीचा सुपुत्र; स्वप्नील धोंडगेनं साकारली ५ गोळ्या झेलणाऱ्या वीर पोलिसाची भूमिका

    ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटात परभणीचा सुपुत्र; स्वप्नील धोंडगेनं साकारली ५ गोळ्या झेलणाऱ्या वीर पोलिसाची भूमिका

    खांद्यावर, छातीवर जखमा अन् उजव्या हाताला बँडेज; गोळीबाराच्या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफचा Video व्हायरल, उपमुख्यमंञी एकनाथ शिंदेंही सोबत

    खांद्यावर, छातीवर जखमा अन् उजव्या हाताला बँडेज; गोळीबाराच्या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफचा Video व्हायरल, उपमुख्यमंञी एकनाथ शिंदेंही सोबत

    Video पाहून अंगावर काटा येईल! ट्रकने ४० ते ५० भाविकांना चिरडले; 15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी

    Video पाहून अंगावर काटा येईल! ट्रकने ४० ते ५० भाविकांना चिरडले; 15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी

    भयानक! दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

    भयानक!  दुर्गाोत्सवात पूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी