मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

मुंबई लोकलमधील भांडणे मग ती पुरुषांची असो की महिला प्रवाशांची नित्याचीच झाली आहेत. मात्र आधी शाब्दिक असणारी भांडणं आता एकमेकांचा जीव घेऊ लागली आहेत. अंधेरी, मालाडहून या स्टेशन दरम्यान तर अशा घटना वारंवार होताना दिसत आहेत.नुकतीच मालाड-विरार लोकलने नायगावला जात असताना लोकलमध्ये गर्दीमुळे दिव्यांगांच्या डब्यात चढलेल्या तरुणीचा एका प्रवाशाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अन् त्यावरून झालेल्या वादात त्या नराधमाने त्या तरुणीला थेट नायगाव स्टेशनजवळ लोकलखाली ढकलून दिल्याची घटना घडली होती. तोच आता अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील आणखी एक धक्कादायक घटना घडली.

दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

मुंबईत धावत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचा फटका एका निष्पाप प्रवाशाला बसल्याची घटना समोर आली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील या घटनेत भांडणादरम्यान फेकलेला चाकू थेट एका प्रवाशाच्या छातीत घुसला. या हल्ल्यात सुरेश द्वारका शर्मा (५३ वर्षे) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्याचे रहिवासी असलेले सुरेश शर्मा गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील सायन-धारावी परिसरात राहतात. ते सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ते कामानिमित्त बोरीवली पूर्व येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी ११.५८ वाजता त्यांनी बोरीवली स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणारी अप फास्ट लोकल पकडली.

अंधेरी स्थानक येण्यापूर्वी हा वाद अधिकच विकोपाला

लोकलच्या पहिल्या जनरल डब्यात दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्या मागील बाजूला बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये शिवीगाळ आणि बाचाबाची सुरू होती. अंधेरी स्थानक येण्यापूर्वी हा वाद अधिकच विकोपाला गेला आणि दोघेही दरवाजाजवळ आले. दुपारी सुमारे १२.१२ वाजता लोकल अंधेरी स्थानकात थांबल्यानंतर त्यापैकी एक प्रवासी फलाटावर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला.

फलाटावर उतरलेला प्रवासी डब्यातील तरुणाला शिवीगाळ करत होता

फलाटावर उतरलेला प्रवासी डब्यातील तरुणाला शिवीगाळ करत होता. लोकल पुन्हा सुरू होताच त्याने रागाच्या भरात हातातील धारदार शस्त्र डब्याच्या दिशेने फेकले. हे शस्त्र संबंधित प्रवाशाला न लागता दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला घुसले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे डब्यात एकच गोंधळ उडाला.

रक्तबंबाळ सहप्रवाशांनी त्यांना मदत करत चेन पुलिंग करून लोकल थांबवली

रक्तबंबाळ अवस्थेत सुरेश शर्मा खाली कोसळले. यावेळी सहप्रवाशांनी त्यांना मदत करत चेन पुलिंग करून लोकल थांबवली.  लोकल बांद्रा स्थानकात पोहोचल्यानंतर आरपीएफ आणि एमएसएफच्या जवानांनी जखमींना तातडीने स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बांद्रा येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमी सुरेश शर्मा यांच्या जबाबावरून हत्येचा प्रयत्न

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली. शिवाजी लक्ष्मण गायकवाड (वय २५ वर्षे, रा. निफाड, नाशिक) असे आरोपीचे नाव असून तो विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले. जखमी सुरेश शर्मा यांच्या जबाबावरून हत्येचा प्रयत्न आणि अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? FDA ची धडक कारवाई, ८५० किलो मिठाई जप्त

    मागील काही महिन्यांपासून राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. दिवाळी आणि सणांच्या पार्श्वभूमिवर तर FDA नं कारवाईचा धडका जास्तच संख्येन वाढवला आहे. एफडीएच्या कारवाईने भेसळखोरांचे धाबे…

    नव्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; मुसळधार पावसाचा अंदाज; तर, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा , तर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द

    मुरासु आणि अर्णब चक्रीवादळाने भारतातील अनेक भागात धुमाकूळ घातला असतानाच बंगालच्या खाडीत मोठे चक्रीवादळ धडकले आहे. ज्यानंतर भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. त्यातच आता नवीन चक्रीवादळाचा अलर्ट जारी…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

    मुंबई लोकलमध्ये थरार! अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना; दोन प्रवाशांच्या भांडणात फेकला गेलेला चाकू थेट तिसऱ्याच प्रवाशाच्या छातीत घुसला

    अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? FDA ची धडक कारवाई, ८५० किलो मिठाई जप्त

    अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? FDA ची धडक कारवाई, ८५० किलो मिठाई जप्त

    नव्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; मुसळधार पावसाचा अंदाज; तर, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा , तर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द

    नव्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम; मुसळधार पावसाचा अंदाज; तर, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा , तर अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द

    अवघ्या १ तास १० मिनिटांत गाठता मुंबईहून सिंधुदुर्ग! आजपासून थेट विमानसेवा सुरू, पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

    अवघ्या १ तास १० मिनिटांत गाठता मुंबईहून सिंधुदुर्ग! आजपासून थेट विमानसेवा सुरू, पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

    पुणेकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी पाहा! अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीचे नियम बदलले; ‘हे’ रस्ते राहणार बंद

    पुणेकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी पाहा! अमित शहांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीचे नियम बदलले; ‘हे’ रस्ते राहणार बंद

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    पुण्याच्या ऐतिहासिक ‘नूमवी’ शाळेत पाकिस्तानचे झेंडे! चित्रपटाच्या सेटसाठी शाळेला पाकिस्तानचे स्वरूप; चिपळूणकरांचा पुतळाही झाकल्याने पुणेकरांचा संताप

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार! ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेचा थरार!  ट्रक अन् लग्जरी बसच्या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य, ३० प्रवासी जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    दिवाळी संपताच नागरिकांच्या खिशाला भुर्दंड; CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला

    मुंबई लोकलमध्ये हादरवणारी घटना! छेडछाडला विरोध केल्याने तरुणीला ट्रेनमधून रुळावर ढकललं; डावा हात कापावा लागला