अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

यंदा हिवाळी अधिवेशनात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांना ब्रेक लागणार आहे. पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा अधिवेशनात पोहोचणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि पत्रकारांना नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी लहान प्लास्टिकची बाटली मिळणार नाही.तर त्याऐवजी पाच, दहा आणि वीस लिटरच्या जारमधून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे

लहान प्लास्टिकची बाटली मिळणार नाही

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दरवर्षी हजारो पाण्याच्या बाटल्यांचा वापर होतो. मात्र, यंदा अधिवेशनात पोहोचणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि पत्रकारांना नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी लहान प्लास्टिकची बाटली मिळणार नाही. त्याऐवजी पाच, दहा आणि वीस लिटरच्या जारमधून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पिण्यासाठी काचेच्या बाटल्या आणि ग्लास वापरले जाणार असून, प्रवासासाठीच लहान बाटलीबंद पाणी दिले जाईल. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि प्लास्टिक कचऱ्याचा वाढता प्रश्न लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हा बदल करण्याचे नियोजन केले आहे.

काचेच्या बाटल्यांमधून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार

अधिवेशन काळात नागपुरात होणारी शहराबाहेरील पाहुण्यांची गर्दी पाहता पूर्णवेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी वापरावर बंदी घातली आहे. मंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱयांच्या शासकीय निवासस्थानी काचेच्या बाटल्यांमधून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू

नागपूर जिह्यातील 14 तालुके दुकाळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. नागपूर शहराला पाणी पुरवणाऱया तोतलाडोह धरणाचा पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे. अशा परिस्थितीत 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते, सनदी अधिकारी, विविध संस्था, संघटनांचे आंदोलक असे किमान 20 ते 25 हजार लोक नागपुरात येतात. नागपूर शहराला दररोज साधारण 740 दशलक्ष लिटर पाणी लागते. अधिवेशन काळात हा वापर वाढतो. त्याचबरोबर नासाडीही मोठय़ा प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार आहे.

किती पाणी लागेल याचा अंदाज अद्यापही प्रशासनाला आलेला नाही

अधिवेशनासाठी आमदार निवासात 1935 व्यक्ती, 160 खोल्यांच्या गाळ्यांमध्ये 1250, रवी भवनमध्ये 357, सुयोगमध्ये 120, पीए क्वार्टर्समध्ये 120, राज्यमंत्र्यांच्या क्वार्टर्समध्ये 96, हॉस्टेलमध्ये 80, विधिमंडळ सचिव इमारतीमध्ये 36, नाग भवनमध्ये 21 व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था आहे. येथील पाणी वापराबरोबरच मंत्र्यांचे बंगले आणि आमदारांचे वास्तव्य असलेली थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये किती पाणी लागेल याचा अंदाज अद्यापही प्रशासनाला आलेला नाही.

मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर 20 लिटरचे जार

नागपूरमधील बहुतेक तालुके ट्रिगर वन अंतर्गत दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे नागपूर महापालिका व जिल्हा प्रशासनाने पाण्याच्या गैरवापरावर कठोर निर्बंध घातले आहेत. पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या दिल्या तर बाटलीतील पाणी अनेक जण पूर्णपणे संपवत नाहीत. शिल्लक राहिलेले पाणी फेकून दिले जाते. त्यामुळे मोठी नासाडी होते. हे टाळण्यासाठी मंत्र्यांचे बंगले आणि दालनाबाहेर वीस लिटरचे पाण्याचे जार आणि पेपर ग्लास ठेवण्यात येणार आहेत.

अधिवेशन काळातच पाणीकपात?

नागपूर शहराला तोतलाडोह धरणातून पाणीपुरवठा होतो. पाऊस कमी झाल्यामुळे या वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. या धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नोव्हेंबर महिन्यातच पाणीसाठा मे महिन्यातील पातळीपर्यंत खाली गेला आहे. त्यामुळे मोठे पाणी संकट डोक्यावर आहे. धरणातील पाणीसाठय़ामध्ये रोज एक टक्क्याने घट होत आहे. त्यामुळे हे पाणी अधिक काळ पुरवण्याच्या दृष्टिकोनातून अधिवेशन काळात दहा टक्के पाणीकपातीचा विचार स्थानिक प्रशासनाने सुरू केला आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. बातम्यांची अचूकता, विश्वासार्ह माहिती, वस्तुनिष्ठ मांडणी आणि वाचकांशी पारदर्शक संवाद यांना ते महत्त्व देतात. संपर्क: amol@jagrutmaharashtra.com

    Related Posts

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या आवारात काल (२६ नोव्हेंबर २०२६ ) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या हल्ल्यात ३५ वर्षीय मंदार किवळेवर…

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    मिरा-भाईंदर महापालिकेत सध्या विकासकामांपेक्षा जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलंय. गेली २५ वर्षे सुरू असलेला नॉनव्हेज मेन्यू महासभेतून अचानक गायब झाल्याने ‘व्हेज’ जेवणावरून राजकारणाला चांगलाच ‘नॉनव्हेज’ तडका बसलाय. विरोधकांसोबतच आता सत्ताधारी…

    Leave a Reply

    You Missed

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    पुणे कोर्टाबाहेरील हल्ला! मंदार किवळेवर हल्ला करण्याचा प्लान आधीच ठरलेला; २०२५ च्या शुभम चव्हाण हत्येचा बदला? काय आहे संपूर्ण प्रकरण?

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    अधिवेशनात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या मिळणार नाही! मंत्र्यांसह पञकारांनाही मनाई; दिल्या जाणार काचेच्या बाटल्या

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ‘नॉनव्हेज’ मेन्यूवरून मिरा-भाईंदर महापालिकेत वाद ! जेवणाच्या ताटावरूनच राजकारण चांगलंच तापलं; विरोधकांसोबतच सत्ताधारीही आक्रमक

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    ठाणे जिल्ह्यातील मतदारांनो सावधान! १७ लाख मतदारांचा पत्ताच सापडेना; निवडणूक विभागाचा व्हॉट्सॲप आणि एसएमएस अलर्ट

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    वय फक्त आकडा! रायफल शूटिंगमध्ये पन्नाशीत प्राचार्या कुमुदिनी चव्हाण यांना सुवर्णपदक; रायगड व शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    मुंबईकरांनो शेकोटी पेटवाल तर दोन हजारांचा दंड! वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    बिस्लेरीचे पाणी पिण्यास घातक! कॅन्सरचा धोका? FSSAI कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    पोलीस भरती करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा! ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास मिळणार ही सवलत; गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली

    दाऊदच्या वडिलोपार्जित घरावरील बुलडोझर कारवाईला हायकोर्टाचा ब्रेक! हायकोर्टाच्या निर्णयामुळे बीएमसीला धक्का, २५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई थांबवली