
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खास करून पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती आहे. कारण पश्चिम रेल्वेवर तब्बल 75 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकलच्या वेळापञकात तर बदल होणारचं आहे पण या ब्लॉकमुळे अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच उपनगरीय लोकल गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
७५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्र. ५ वरील दुरुस्ती आणि पुनर्बांधणी कामासाठी ७५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. १ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ब्लॉकबाबत माहिती दिली आहे. ब्लॉक काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, अशा सूचना रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत.
वांद्रे टर्मिनसऐवजी दादरहून सुटणाऱ्या गाड्या
भुज – वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते १२ फेब्रुवारीदरम्यान वांद्रेऐवजी दादर स्थानकावरच समाप्त होईल. तसेच, वांद्रे टर्मिनस भुज एक्स्प्रेस वांद्रेऐवजी सायंकाळी ५:४० वाजता दादरहून सुटेल.
दादरऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्या
अजमेर – दादर एक्स्प्रेस दादर ऐवजी वांद्रे टर्मिनसपर्यंतच धावणार आहे. दुपारी २:५५ वाजता ती तेथूनच सुटेल. तर श्री गंगानगर – दादर एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसपर्यंतच येईल व दुपारी २:५५ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. तर, भगत की कोठी – दादर एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसपर्यंतच चालवली जाईल आणि दुपारी २:५५ वाजता परतीच्या प्रवासासाठी तिथूनच सुटेल.
दादरऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्या
अजमेर – दादर एक्स्प्रेस दादर ऐवजी वांद्रे टर्मिनसपर्यंतच धावणार आहे. दुपारी २:५५ वाजता ती तेथूनच सुटेल. तर श्री गंगानगर – दादर एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसपर्यंतच येईल व दुपारी २:५५ वाजता परतीच्या प्रवासाला निघेल. भगत की कोठी – दादर एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसपर्यंतच चालवली जाईल आणि दुपारी २:५५ वाजता परतीच्या प्रवासासाठी तिथूनच सुटेल.
बोरिवली स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे
भुज (२२९०४), मडगाव (१०११६), उधना (१९०५६), जयपूर (१९७२३) आणि दौराई (१९६२५) येथून वांद्रे टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरच समाप्त होतील. तर परतीच्या प्रवासात उधना (स. ९:४०), मडगाव (स. ७:२५), जयपूर (स. ९:२५) आणि दौराई (स. ९:२५) एक्स्प्रेस या वांद्रे ऐवजी बोरिवली स्थानकावरून सुटतील.
काही लोकल रद्द राहणार
१ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान काही लोकल रद्द राहतील. दुपारी २:५० वाजताची चर्चगेट-बोरिवली फास्ट लोकल, दुपारी ३:४० वाजताची बोरिवली – चर्चगेट स्लो लोकल, सायंकाळी ५:५० वाजताची चर्चगेट-बोरिवली एसी फास्ट लोकल आणि सायंकाळी ६:२४ वाजताची बोरिवली-चर्चगेट एसी फास्ट लोकल ब्लॉक काळात बंद राहील.








