जालना जिल्ह्यात हृदयद्रावक घटना : शेतीकाम करताना वडील आणि दोन चिमुकल्यांचा विद्युत धक्क्याने मृत्यू

जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पावसाने सध्या दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या तयारीसाठी शेतात गेलेल्या एका शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेतकाम करत असताना विद्युत तारेचा शॉक लागून वडिलांसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

ही घटना जालना तालुक्यातील वरुड गावात घडली. विनोद मस्के असे मृत पित्याचे नाव असून, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा समर्थ मस्के आणि मुलगी श्रद्धा मस्के या दोघांचाही मृत्यू झाला आहे. हे तिघेही पेरणीपूर्व कामांसाठी शेतात गेले असताना अचानक विद्युत तारेचा संपर्क आल्याने हा अपघात घडला.

घटनेनंतर तिघांनाही तत्काळ उपचारासाठी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. सध्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

या अपघातामुळे मस्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण वरुड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मुंबई: मराठीचे वैभव जगासमोर आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी, मुंबई येथील पु.ल.देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर येथे अत्यंत दिमाखात…

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    नवी दिल्ली : राज्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास Supreme Court of India यांनी स्पष्ट मनाई केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल २२ जिल्हा परिषद आणि…

    Leave a Reply

    You Missed

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    • By Admin
    • February 27, 2026
    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    • By Admin
    • February 23, 2026
    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    • By Admin
    • February 13, 2026
    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    • By Admin
    • February 8, 2026
    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६