अपमानापेक्षा मरण बरे! पोलिसांच्या २ वर्षांच्या तडीपार नोटिशीनंतर मंगेश साबळेंचा VIDEO व्हायरल, गावकऱ्यांशी बोलताना ढसाढसा रडले

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच असलेल्या मंगेश साबळे यांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपारची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर खंडणी, गुंडगिरी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपांशी संबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर आणि फुलंब्री या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

गावकऱ्यांशी बोलताना रडू कोसळलं

मंगेश साबळे यांना तडीपारची नोटीस बजावल्यानंतर त्यांचा गावातील एका कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडीओमध्ये ते गावकऱ्यांशी संपर्क साधताना दिसत आहे. त्यावेळी ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. ते या भाषणात म्हणताना दिसत आहेत की,”वडील सांगायचे अपमानापेक्षा मरण बरे.मी काय गुंड आहे का? मला पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे.पण आज खोट्या गुन्ह्याचा विरोधात संपूर्ण गाव माझ्या पाठीमागे आई वडलाप्रमाणे अन्यायाविरुद्ध उभे राहिले” यावेळी बोलतानाच मंगेश साबळे यांना भावना अनावर झाल्या. त्यांना भावूक झालेलं पाहून गावकऱ्यांनाही हळहळ वाटली. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. सर्वांनी त्यांना यावेळी पाठिंबाही दर्शवला.

मंगेश साबळेंचे पैसे उधळल्याचे आंदोलनही चर्चेत 

मंगेश साबळे हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. विविध आंदोलनांमधून ते चर्चेत राहिले आहेत. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना वेठीस धरणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांनी तहसील कार्यालयात पैशांची माळ घेऊन जाऊन पैसे उधळल्याचे आंदोलनही चर्चेत आले होते. पोलिसांनी 8 ऑगस्ट रोजी त्यांना तडीपारीची नोटीस बजावली होती. स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही त्यांनी पोलिसांना कायदेशीर खुलासा केलेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

View this post on Instagram

A post shared by @tadiparmangeshsable

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असल्यामुळे तडीपारची नोटीस देण्याचा डाव असल्याचा आरोप

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगेश साबळे यांनी कायद्याचा आदर करून आपली बाजू मांडणे अपेक्षित होते. मात्र, ते समाजमाध्यमांवर वक्तव्य करत आहेत. ते हजर न राहिल्यास एकतर्फी अहवाल सादर करून तडीपारीची कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, मंगेश साबळे यांनी ही कारवाई सूडातून केली जात असल्याचा आरोप केला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असल्यामुळे आपल्याला जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईविरोधात राज्यभर भीक मागो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मंगेश साबळे हे चर्चेत आले होते

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मंगेश साबळे हे चर्चेत आले होते. त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर स्वतःची गाडी जाळल्यामुळे त्यांच्याबद्दल समाजामध्ये सहानुभूती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यांना जवळपास दीड लाख मते मिळाली होती. त्यांच्या निवडणूक लढतीमुळे काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मंगेश साबळे यांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा चेहरा मानले जाते. आता पोलिसांनी बजावलेल्या दोन वर्षांच्या तडीपारच्या नोटिशीला ते कायदेशीर उत्तर देतात का आणि त्यांच्यावर प्रत्यक्षात तडीपारीची कारवाई होते का, याकडे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच