शिंदे, साटम ते गोगावले… मनपा इंजिनिअर्सच्या बदली-पदोन्नतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिफारशी, माहिती अधिकारात ‘फील्डिंग’ उघड

मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत धोरण आणण्याचे ठरवलं जात होतं. मात्र या बदल्या करताना प्रत्येक अभियंत्याला किमान तीन ते पाच प्राधान्यक्रम देण्याची सुविधा असावी, तसेच एकाच पदावर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांना प्राधान्य द्यावे अशा सूचना अभियंत्यांच्या संघटनेने केल्या होत्या.मात्र मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन धोरण आणण्याची चर्चा सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.

अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन धोरण सुरू असतानाच धक्कादायक माहिती

महापालिकेतील विविध महत्त्वाच्या विभागांमधील अभियंत्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसाठी राजकीय नेत्यांच्या शिफारस पत्रांचा मोठा मारा सुरू असल्याचे माहिती अधिकारातून म्हणजे RTI मधून उघड झाले आहे. मुंबई महापालिकेत पदोन्नती व बदल्यांसाठी अभियंत्यांकडून शिफारशी केल्या जात असल्याचं समोर आलं आहे. जलअभियंता विभाग, स्थापत्य विभाग, पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग आदी विभागांतील अभियंत्यांनी बदल्यांसाठी नेत्यांमार्फत शिफारशी केल्या जात असल्याचं समोर आलं आहे .काही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रे दिली असून, त्यांची प्रत मुंबई महापालिकेकडे पाठविल्याचे समोर आले आहे.

मंत्री, आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून शिफारशी 

प्रत्यक्षात राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नती, पदस्थापना आणि बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात शिफारशी होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

२०२४, २०२५ आणि २०२६ या काळात अशा अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. शिफारसपत्रे देणाऱ्यांमध्ये अंधेरी विधानसभा आमदार अमित साटम,भाजपा मुंबई अध्यक्ष मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांची नावे असल्याचं समोर आलं आहे.तर, विरोधी पक्षातील अंबादास दानवे, महेश सावंत आदींचाही यात समावेश असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनीही शिफारसपत्रे दिल्याचे समोर आले आहे.एवढंच नाही तर मुंबईबाहेरील आमदार, खासदारांनीही मुंबई महापालिकेतील अभियंत्यांसाठी शिफारसपत्रे दिली असल्याचं समोर आलं आहे.

आरटीआय कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अनेक अभियंत्यांनी एकाच पदावर ६-७ वर्षे काम केल्यामुळे, तर काहींनी कौटुंबिक कारणांमुळे दुसऱ्या विभागात जाण्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींनी सनदी अधिकारी किंवा महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी अशा प्रकारे शिफारशी करू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने अधिकृत अधिसूचना काढावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये १२२ सहाय्यक व दुय्यम अभियंत्यांच्या बदल्यांवरून वाद निर्माण झाला होता, ज्याची दखल घेत प्रशासकीय कारवाईही करण्यात आली होती. मात्र, आता समोर आलेल्या या माहितीमुळे महापालिकेतील बदल्यांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोणी कोणी शिफारसरपत्रे दिली आहेत?

अंधेरी विधानसभा आमदार अमित साटम, राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), अण्णा दादू बनसोडे (विधानसभा उपाध्यक्ष), अमित साटम (मुंबई भाजप अध्यक्ष), गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री), माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री), चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री), पंकजा मुंडे (पर्यावरण मंत्री), शिवेंद्रराजे भोसले (सार्व. बांधकाम मंत्री), उदय सामंत (उद्योगमंत्री), राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री), भरत गोगावले (रोहयो मंत्री), प्रकाश आबिटकर, (आरोग्य मंत्री), कालिदास कोळंबकर (आमदार), प्रसाद लाड (आमदार), रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री), मंगलप्रभात लोढा (मंत्री), प्रवीण दरेकर (आमदार), गोपिचंद पडळकर (आमदार), तुकाराम काते (आमदार), दिलीप लांडे (आमदार), नरहरी झिरवळ (मंत्री), प्रकाश सुर्वे (आमदार), महेश सावंत (आमदार), अंबादास दानवे (आमदार), सुनील प्रभू (आमदार), श्रीकांत शिंदे (खासदार), गणेश नाईक (मंत्री), राहुल शेवाळे (माजी खासदार)

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच