मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास दोन दिवसांपूर्वी नकार दिला होता. पण त्यामुळे त्यांची तब्येत खालावली असून रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालं , तसेच त्यांचे सात किलो वजन कमी झालं आहे त्यामुळे काल रात्री मध्यरात्री जरांगे पाटील यांची तब्येत अजून खालावली.

रात्री अडीच वाजता जरांगेंची तब्येत खालावली

जरांगेंच्या तब्येतीबाबत समजताच सरकार खडबडून जागे झाल्याच बोललं जात आहे. रात्री अडीच वाजता तपासणी केल्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ही मिळताच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी फोन करून सकाळपासून कार्यवाही सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी सलाईन घेतले‌. तसेच सर्व प्रकारच्या मागण्यांवर सरकार काम करत आहे, त्या पूर्ण होतील, असे आश्वासन मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिले असल्याचा दावा जरांगे समर्थकांकडून केला जात आहे.दरम्यान प्रकृती खालावल्यानंतर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखत टायर जाळले तर आज देखील आंदोलनं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक 

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे आणि त्यांनी मुंबई येथे आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला महायुतीमधील दिग्गज नेते उपस्थित होते.

जरांगे यांच्या मागण्यांबाबत चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. वर्षा बंगल्यावरील ही बैठक रात्री दोन वाजता संपली. तसेच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड हे नेते होते उपस्थित होते. जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत नेमकी काय झाली, याविषयी अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे जरांगेंच्या उपोषणाच्या ११ व्या दिवशी नेमकं काय निर्णय होणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा बीडमधील प्रमुख चेहरा आमदार धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जीममधला असून धनंजय मुंडे यांनी वर्कआऊट करतानाचा…

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची…

    Leave a Reply

    You Missed

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन