चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब महादेव कोठुळे यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. दिनांक २० जून २०२६ रोजी दिल्ली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल या संस्थेकडून त्यांच्या सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील बाळासाहेब कोठुळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात गेली पंधरा वर्षे निर्भीड आणि निष्पक्षपणे काम केले आहे. समाजातील प्रश्न, सामान्य नागरिकांचे विषय आणि जनहिताचे मुद्दे त्यांनी सातत्याने लेखणीच्या माध्यमातून मांडले. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.

दैनिक पुढारी कोल्हापूर, दैनिक पुणे प्रभात, दैनिक गावकरी नाशिक, दैनिक सार्वमत श्रीरामपूर यांसह महाराष्ट्राची भूमी, नगर परिवर्तन अशा साप्ताहिकांमधूनही त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले आहे. तसेच दैनिक लोकशक्ती, दैनिक लोक परिवर्तन, दैनिक रोखठोक, दैनिक साहित्य सेवा आणि दैनिक साहित्य तेज अशा विविध ऑनलाईन ई-पेपरमधूनही त्यांचे लिखाण सुरू आहे.

पत्रकारितेसोबतच साहित्य क्षेत्रातही बाळासाहेब कोठुळे यांचे गेल्या तीस वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान आहे. अनेक कवी संमेलने, साहित्य संमेलने आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठांवरूनही त्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक, संवेदनशील साहित्यिक आणि समाजभान जपणारे पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.

त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत अचिव्हर अवॉर्ड कौन्सिल या संस्थेकडून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. या सन्मानाबरोबरच संस्थेचे आमरण सदस्यत्वही त्यांना मिळाले असून, ही बाब त्यांच्या कार्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे.

बाळासाहेब कोठुळे सरांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नेवासा तालुक्यातील निंबारी येथील कवी गोरक्षनाथ पवार, प्रा. मोहिनीराज होन सर, डॉ. बाळासाहेब वाहूरवाघ, अॅड. संजय माकोणे सर, ज्येष्ठ कवी आत्माराम शेवाळे आणि कवी राजेंद्र उदारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या बाळासाहेब कोठुळे सरांचा हा सन्मान त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

खरकटी भांड्यांत हरवलेलं बालपण…. ज्या वयात त्याच्या हातात भविष्याची स्वप्नं, पुस्तकं आणि खेळण्याचं साहित्य असायला हवं होतं, त्या हातात जेवण झाल्यानंतर उरलेली खरकटी भांडी होती. एका हातात कापड होतं आणि…

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे अन् घटस्फोटाचा बनाव; ३३ शिक्षकांचे निलंबन, ६५ जणांची वेतनवाढ रोखली

अकोल्यातील शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्यात आली.अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजलेल्या बहुचर्चित…

Leave a Reply

You Missed

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंडुल आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंडुल आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार