‘आम्ही खूप विचार केला,पण…’ मराठीतील लोकप्रिय जोडप्याचा लग्नानंतर १५ वर्षानंतर घटस्फोट;सोशल मीडियावर पोस्ट, चाहत्यांना धक्का

बॉलिवूडप्रमाणेच आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमधील घटस्फोटाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं वेगळं झालं आहे. लग्नाच्या १५ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबाबतची एक पोस्ट करून त्यांनी चाहत्यांना धक्काच दिला आहे.

अखेर नात्याला पूर्णविराम 

दरम्यान आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यात अलबेल नसल्याची चर्चा तशी बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. अखेर त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे.आदिनाथ आणि उर्मिला यांनी त्यांच्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊन चाहत्यांनाही विचारत पाडलं आहे.गुरुवारी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची चाहत्यांना माहिती दिली. दोघांनीही एकमेकांबद्दल आदर कायम ठेवत पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची मुलगी जिजासाठी मात्र दोघेही सह-पालकत्वाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

“खूप विचार केल्यानंतर, आम्ही…” पोस्ट चर्चेत

2025 पासूनच आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. सोशल मीडियावर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय “खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत.” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत चाहत्यांना ही माहिती दिली.

Urmila and Adinath Post
Urmila and Adinath Post

पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला 

आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज होतं. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. मात्र आता या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने हे त्यांच्या अभिनय कौशल्यासोबतच सोशल मीडियावर स्पष्ट राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांच्या आयटी सेल (IT Cell),…

अभिनेता राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा लिलाव; डोक्यावर 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांचे चेक बाऊन्स प्रकरण अद्याप सुटलेले नाही.या प्रकरणामुळे राजपालच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या…

Leave a Reply

You Missed

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव