‘अभिजित दिपके स्टंटबाजी बंद करा, जनतेची फसवणूक…’ भाजप नेते प्रसाद लाड यांची जोरदार टीका

दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. अश्यातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या आंदोलनावरून चांगलीच टीका केली आहे. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावरही निशाणा साधला आहे.

आमदार प्रसाद लाड यांचा अभिजित दिपकेंवर निशाणा 

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्टंटबाजी करून सोशल मीडियावरून जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिक तापले आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून त्यांनी पोस्ट करत दिपके यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे. ‘अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी!” अश्या शब्दांत त्यांनी अभिजित दिपके आणि जंतर मंतर वरील आंदोलनाला लक्ष्य केले आहे.

स्टंटबाजी बंद करावी….

प्रसाद लाड म्हणाले की, “अभिजित दिपके यांनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी. लोकशाहीत आंदोलनाला विरोध नाही, परंतु स्टंटबाजीला निश्चितच विरोध आहे. NEET चा विरोध म्हणून आंदोलन उभारलं, सोनम वांगचुक यांना उपोषणाला बसवलं, परंतु स्टंटबाजी करून सोशल मिडिया वापरून जनतेची फसवणूक करणे आता बंद केले पाहिजे…” असं म्हणत प्रसाद लाड यांनी जोरदार टीका केली आहे.

मुंबईतही उद्धव ठाकरेंकडूनही आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अन्नत्याग आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना मुंबईतही या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी न करता केंद्रातील सरकार बदलण्याचे आवाहन केले.

या आंदोलनाला आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी राज्यभरातून नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.

 जंतरमंतर येथून आंदोलकांना बाहेर पडण्याची परवानगी नाही

दिल्ली पोलिसांनी २० जुलै २०२६ रोजी कॉकरोच जनता पार्टीने प्रस्तावित केलेल्या ‘संसद मोर्चा’बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चा किंवा आंदोलंनासाठी परवानगी दिलेली नाही किंवा अधिकृतपणे मागितलेली नाही. पोलिसांनी जंतरमंतर येथून आंदोलकांना बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसोच सध्या जंतरमंतर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक