दगडांनी भरलेला डम्पर,काचा फुटलेली कार,लाठीचार्ज; आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले, नेमकी काय परिस्थिती?

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.कॉकरोच जनता पार्टीने आज २० जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली आहे. जंतरमंतरवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून थेट कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. तरीही जंतर-मंतर येथे सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जमले आहेत. CJP चे संस्थापक अभिजीत दीपक यांनी स्पष्ट केले की, “आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून कोणतीही अनुचित कृती होणार नाही. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण राहील, जेणेकरून आंदोलनाची प्रतिमा बिघडू नये.” मात्र तरी देखील या मोर्चाला रोखण्यात येत आहे. यामुळेच आता आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणून ठेवल्याचा आरोप

अभिजीत दीपके यांनी याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिल्ली पोलिसांवर आरोप केला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणून ठेवला असल्याचा आरोप केला आहे. सोबत त्यांनी काचा तुटलेली एक कार देखील आणल्याचा आरोप केला आहे. तसेच आता लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या टाकल्यानंतरही आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले आहे.

” CJP कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याची तयारी चालू आहे का?”

जंतर-मंतर परिसरात अचानक दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावरून कॉकरोच जनता पार्टीने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दीपके यांनी या दोन्ही वाहनांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, “जंतर-मंतरवर दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाचा नेमका काय डाव आहे? शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याची तयारी चालू आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

“दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे.”

तर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की,”दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे. आधीच जंतर-मंतरवर दगड भरलेला ट्रक आणि एक नादुरुस्त व्हॅन आणून ठेवण्यात आली आहे. लवकरच मीडिया याची बातमी चालवेल की, आंदोलकांनीच या वाहनांची तोडफोड केली.” CJP ने हा प्रकार दिल्ली पोलिसांचा आंदोलनाला बदनाम करण्याचा कट असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे आता हे आंदोलन कोणतं वळण घेणार , शांततापूर्ण हे आंदोलन चालणार की चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

Leave a Reply

You Missed

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक