पावसामुळे वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रेला फटका; दर्शनाबाबत भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय

जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वैष्णोदेवी आणि अमरनाथ या दोन्ही यात्रांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हवामान अनुकूल होईपर्यंत यात्रेकरुंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसापांसून राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस मुसळधार पावसांचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हवामानाचा परिणाम

वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे यात्रेकरुंना काही दिवसांसाठी प्रवास थांबवण्याचा सल्ला देण्यात आला. श्री माता वैष्णो देवी श्राझन बोर्डानेही अधिकृतपणे यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती दिली आहे. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरही पुढील निर्णय घेतला जाईल, असे बोर्डानं स्पष्ट केले आहे.

अमरनाथ यात्रेलाही या निर्णयाचा फटका

अमरनाथ यात्रेलाही या निर्णयाचा फटका बसला आहे.पहलगाम आणि बाल्टाल या दोन्ही प्रमुख मार्गांवरून जाणारी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बेस कॅम्पच्या पुढे कोणत्याही यात्रेकरूला जाण्याची परवानगी सध्या दिली जात नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डोंगराळ भागात धोका वाढला आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती बिघडली असून, डोंगराळ भागात धोका वाढला आहे. त्यामुळे हवामान सुधारल्याशिवाय यात्रा पुन्हा सुरू करणे योग्य ठरणार नाही. मार्गांची तपासणी, हवामानाचा अंदाज आणि सुरक्षा यंत्रणांचा अहवाल यांचा विचार करूनच पुढील निर्णय जाहीर केला जाणार आहे.

भाविकांना संयम बाळगण्याच्या सुचना

यंदाच्या अमरनाथ यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत सुमारे 3.76 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाविकांनी संयम बाळगणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच भाविकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये,असे प्रशासनाने सांगितले आहे. यात्रेबाबतचे सर्व अपडेट्स केवळ अधिकृत माध्यमांद्वारे पाहावेत. असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानतील बदल लक्षात घेऊन प्रशासन सतत परिस्थितीचा आढावा घेत आहे.

यात्रा काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय

दरवर्षी लाखो भाविक या दोन्ही धार्मिक यात्रांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये येतात. मात्र, डोंगराळ प्रदेशातील हवामान क्षणाक्षणाला बदलत असल्याने अशा परिस्थितीत सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे यात्रा काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला गेला असला तरी तो केवळ भाविकांच्या हितासाठीच असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

यात्रा पुन्हा कधी सुरु होणार?

सध्या सर्व यंत्रणा हवामानावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पाऊस कमी झाला, रस्ते सुरक्षित झाले आणि प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. तोपर्यंत भाविकांनी कोणतीही घाई न करता प्रशासनाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी आणि केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    मुंबई पश्चिम उपनगरात वर्सोवा व मढ यादरम्यान सुमारे दोन हजार ३९५ कोटी रुपयांच्या केबल-स्टेड उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मढ बेट आणि वर्सोवा यांना जोडणाऱ्या मालाड खाडीवरील प्रस्तावित…

    Leave a Reply

    You Missed

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक